लेखांक १४१ : पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांनी बांधलेला जगातला सर्वात सुंदर घाट , महिष्मती अर्थात महेश्वर घाट !
कधी एकदा महेश्वरचा घाट बघतो असे मला झाले होते . समोर असलेल्या शालिवाहन गावातून जेव्हा मी हा घाट पाहिला तेव्हाच त्याच्या प्रेमात पडलो होतो ! नावडा टोली इथून एकाने माझे फोटो काढताना सुद्धा मागे हा घाट ठेवला होता जो माझ्या लक्षात राहिला होता . इतका सुंदर घाट जवळून बघण्यासाठी माझे डोळे आसुसलेले होते .त्यामुळे वेगाने अंतर तोडत महेश्वर शहरामध्ये प्रवेश केला .हे मध्य प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ आहे . त्यामुळे इथे कायम पर्यटकांचा राबता असतो . गाडीने परिक्रमा करणारे लोक देखील खलघाट च्या पुला नंतर थेट इथेच पोहोचतात . त्यामुळे हा भव्य घाट कायम लोकांनी गजबजलेला असतो . आम्ही चालत सर्वप्रथम पंढरीनाथ आश्रमामध्ये पोहोचलो . पंढरपूरच्या पांडुरंगाचे सुंदर असे मंदिर येथे आहे . समोर गरुड आहेत . इथे अतिशय थकलेले आणि वयस्कर बहुधा मराठीच असणारे एक साधू सेवा देत होते . त्यांचे नाव अरुण महाराज असे होते .हा आश्रम डोंगरे महाराजांनी स्थापन केलेला आहे असे कळाले .महाराजांनी आग्रह केल्यामुळे इथे भोजन केले . आश्रम अतिशय साधा परंतु शिस्तबद्ध होता . मंदिराच्या शेजारी भोजनाची व्यवस्था होती .अनेक गरीब लोक इथे रोज जेवायला येत असत. मंदिर दगडामध्ये असून अतिशय मजबूत आणि सुंदर होते . पांडुरंगाची मूर्ती पाहून खूप बरे वाटले .तसेही माझ्याजवळ असलेल्या शबनम पिशवीवर माऊली आणि पांडुरंगाचे फोटो छापलेले होते . पूजा करताना मी ते देखील समोर ठेवत असे . परंतु प्रत्यक्ष सावळ्या रूपातील मूर्ती पाहून फार बरे वाटले . मी आणि गुरू ने इथे दुपारी गायन सेवा केली . पांडुरंगाचे अनेक अभंग आम्ही इथे गायलो .
जाणारा घाट पंढरीनाथ मंदिर
.सिरोलाल ,तुकाराम बुवा आणि गुरु यांना मी पुढे जायला सांगितले . कारण मला माझ्या पद्धतीने आणि माझ्या गतीने महेश्वर चा घाट अनिमिष नेत्रांनी पहायचा होता . विशेषतः गुरु ची अजून संपूर्ण परिक्रमा बाकी असल्यामुळे या सर्वांना मागे टाकत त्याने एकट्याने पुढे सुटावे असे मी त्याला सुचवले आणि रोज किती किलोमीटर चालावे याचे गणित देखील पुन्हा एकदा त्याला लक्षात आणून दिले . त्याने देखील प्रेमभराने मला मिठी मारून निरोप घेतला आणि मी शांतचित्ताने महेश्वर घाट बघायला सुरुवात केली . चालत चालत मी घाट उतरून खाली आलो . नर्मदा मैयाचे दर्शन घेतले . या घाटाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत . या घाटावर घडलेल्या एका घटनेमुळेच हा ब्लॉग जन्माला आलेला आहे ! ते कसे ते पुढे पाहूच. मनकामनेश्वर मंदिरासमोर असलेल्या मतंगेश्वर घाटावर मला हा अपघात झाला होता . असो . या घाटातील एका एका वास्तू बद्दल लिहायचे म्हटले तर हा लेख पुरणार नाही . तो मोह विस्तारभयास्तव टाळत आहे . तसेच केवळ शब्दांनी या घाटाच्या सौंदर्याचे वर्णन करण्यास माझे पामराचे शब्द सामर्थ्य फारच तोकडे आहे . म्हणून आंतरजालावर उपलब्ध असलेली काही चित्रे आणि गतवर्षी मी स्वतः पुन्हा एकदा त्या घाटावर गेल्यावर काढलेली काही चित्रे यांच्या साह्याने तुम्हाला परिसराचे दर्शन घडवावे असे वाटते . मातंगेश्वर घाटाच्या जवळच अहिल्याबाई होळकर यांच्या मुलीची , मुक्ताबाई ची समाधी आहे . इतकी सुंदर समाधी कोणाची या जगात असू शकेल यावर आपला विश्वास बसत नाही . इथे अशा जागेला छत्री म्हणायची पद्धत आहे . त्यामुळेच पुण्यामध्ये असलेल्या महादजी शिंदे यांच्या समाधीला शिंदे छत्री म्हणतात पहा . असो . मुक्ताबाईंची छत्री फारच अप्रतिम आहे .अतिशय अप्रतिम असा घाट याही मंदिराला लाभलेला आहे . मजबूत पायऱ्या चढून गेल्यावर एक अप्रतिम कोरीवकाम असलेले प्रवेशद्वार आपले स्वागत करते . या मंदिराच्या सीमा भिंतीतून बाहेर आलेले सज्जे हे विशेष लक्षवेधी आहेत . इथून आत मध्ये गेल्याबरोबर मला काही फायबरच्या नावा किंवा कयाक ठेवलेल्या दिसल्या . दक्षिण तटावरून जाताना सहस्र धारेपाशी होणारी कयाक ची रेस आपण पाहिली होती त्याच ठिकाणी जाण्यासाठी या नावांचा वापर केला जात असे .
इथे मला दिसलेले एक अत्यंत सुखावह चित्र म्हणजे इथे काही तरुण प्रचंड घाम गाळत व्यायाम करत होते . संपूर्ण नर्मदा खंडामध्ये नर्मदापुरमचा घाट सोडल्यावर इथेच व्यायाम करणारी मुले भेटली . हे चित्र फारसे आश्वासक निश्चितच नाही . जेव्हा भारतातील प्रत्येक नदीचा प्रत्येक घाट भल्या पहाटे मांड्यांच्या षड्डूंनी आणि जोरांच्या हुंकाराने घुमू लागेल तेव्हाच आपला देश पुन्हा एकदा सशक्त , समर्थ आणि समृद्ध होईल . व्यायाम करणाऱ्या मुलांची थोडावेळ विचार विनिमय करून तो सर्व परिसर पाहिला . मुलांनी त्या ठिकाणी माझे काही फोटो काढले ते मी त्यांना माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवायला सांगून दिले . माझ्या हातामध्ये असलेला धनुष्यबाण पाहून त्यांना विशेष कौतुक वाटले . इथे एका धनुर्धारी महिलेचे शिल्प होते .ते त्यांनी मला दाखवले आणि तिथे त्यांनी माझा फोटो काढला . एका साधूच्या शिल्पाच्या एका हातात माळ आणि एका हाती शस्त्र होते तिथे देखील फोटो काढला . एक बंदूकधारी जोडप्याचे शिल्प होते ते देखील मला आवडले . इथे शेजारीच एका मद्रासी बाबांचा आश्रम होता . मी तमिळ बोलतो आहे कळल्यावर बाबांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी मला अतिशय अप्रतिम अशी मदुराईच्या नरसूची कॉफी आश्रमाच्या सज्जामध्ये बसून पाजली ! तिथून नर्मदा मैयाचे अत्यंत मनोहारी दर्शन अखंड होत होते ! तमिळ साधू जगात कुठेही गेले तरी त्यांच्या पूर्वाश्रमीच्या सवयी सोडत नाहीत असे मला जाणवले ! बाबांशी थोडावेळ गप्पा मारून पुढे गेलो . घाटावर नेहमीप्रमाणे पर्यटकांची खूप गर्दी होती . महेश्वर गाव माहेश्वरी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे . हात मागावर तुमच्यासमोर साड्या विणून देण्याची इथली पद्धत मला विशेष आवडली . इथे अप्रतिम संग्रहालय आहे तसेच पाहण्यासारखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचे देवघर होय .
अहिल्याबाई होळकर यांचा राहता राजवाडा अत्यंत साधा आहे . पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचे मोल अगदी थोडक्यात सांगायचे तर त्यासाठी आपल्याला शिवछत्रपतींच्या काळापर्यंत मागे जावे लागते . शिवप्रभूंनी आपला देह ठेवताना शेवटच्या काही इच्छा व्यक्त केल्या होत्या ज्या त्यांच्या विविध समकालीन चरित्रांमध्ये नोंदवून ठेवल्या गेलेल्या आहेत . आपले प्राण पंचत्वात विलीन करण्यापूर्वी शिवछत्रपतींनी शेवटची इच्छा अशी व्यक्त केली होती . शिवप्रभु म्हणाले होते , "सप्त नद्या सप्तसिंधू मुक्त करा . काशीचा विश्वेश्वर सोडवा . चूकूर होऊ नका . आम्ही आता येतो . आमचा समय जाहला . "
यातील सप्त नद्या सप्तसिंधू मुक्त करण्याचे महान कार्य तिथून पुढच्या मराठा परंपरेने अतिशय निष्ठेने केले .यामध्ये सर्वच जातीचे महान हिंदु योद्धे मराठा या एकाच नावा खाली प्राणपणाने लढले होते .परंतु काशीचा विश्वनाथ सोडवण्याचे आणि त्या काशी विश्वेश्वरासोबतच भारतातील सर्वच मंदिरांचा न भूतो न भविष्यती असा अभूतपूर्व जीर्णोद्धार करण्याचे अति अति अति महत्त्वाचे कार्य करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे अहिल्याबाई होळकर ! त्यानंतरची चुकुर किंवा फितूर होऊ नका ही इच्छा मात्र पूर्ण करण्यात आपला समाज सपशेल अपयशी झालेला आहे . ज्यांनी आयुष्यभर शिवछत्रपतींचा आणि आपल्या धर्माचा द्वेष केला त्यांच्या इशाऱ्यावर नाचत आपल्याच धर्माची हानी करण्याचे मोठे पाप आपल्याच समाजातील काही लोक करताना पाहिले की अतिशय दुःख होते . मंदिरांचा जिर्णोद्धार करून धर्माचा जागर करणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांची समाधी आणि त्यांचे देवघर पाहण्याची मनापासून इच्छा होती . आपले सर्व वैभव लुटून टाकावे आणि देवाचे वैभव वाढवावे असा नित्यनेम ज्यांनी आयुष्यभर पाळला त्या अहिल्याबाई होळकर यांनी ठरवले असते तर प्रचंड राजवैभव भोगत अतिशय ऐशो आरामाचे जीवन त्या अखेरपर्यंत जगू शकल्या असत्या . परंतु केवळ एक पांढरी साडी नेसत अंगावर कुठलेही अलंकार न घालता त्यांनी आपल्या वाट्याला आलेले सर्व वैभव देवाचे आहे असे जाणत भारतातील आसेतूहिमाचल शब्दशः हजारो तीर्थक्षेत्रांचा कायापालट करून टाकला ! यातील शून्यापासून केलेले जीर्णोद्धारच शेकड्याने आहेत . किरकोळ मदतींची तर नोंद न ठेवलेलीच चांगली ! इतके महान कार्य करणाऱ्या अहिल्याबाईंचा देव्हारा मात्र अतिशय साधा होता परंतु तिथे जाणवणारे सामर्थ्य आणि पावित्र्य हे वर्णनातीत होते . अहिल्याबाईंच्या देव्हाऱ्यामध्ये सोन्याचे अलंकार आणि सोन्याचा झोपाळा होता . विशेषतः नर्मदा मातेमध्ये सापडलेले विविध रंगाचे आकाराचे प्रकारचे नर्मदेश्वर पाहून मन हरखले . इतक्या महान तपस्वीनी साध्वीला नर्मदा मैयाने आपण होऊन सर्वोत्तम असे नर्मदेश्वर हातात आणून दिले नाहीत तरच नवल !
इथे दर्शनासाठी मी जाताना तिथे संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांनी मला अडवले . माझ्या हातात असलेल्या धनुष्यबाणावर त्यांनी आक्षेप घेतला . ते मला म्हणाले धनुष्यबाण घेऊन तुम्ही अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी फिरू शकत नाही . मी त्यांना सांगितले की १९६७ सालच्या शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याची अर्थात आर्म्स ॲक्ट ची प्रत आणावी आणि त्यात धनुष्यबाण घेऊन फिरण्यास बंदी आहे असे कुठे लिहिले आहे ते मला दाखवावे . माझे हे प्रत्युत्तर त्यांना अनपेक्षित असल्यामुळे पोलीस गडबडले . मग मी त्यांना विश्वासात घेऊन सांगितले की बाबांनो शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदा कशासाठी आहे याचे वर्म त्यांनी समजून घ्यावे . नर्मदा परिक्रमा ही किती महान परंपरा आहे आणि ती करताना सोबत कुठले तरी शस्त्र बाळगणे हे कसे हिताचेच आहे हे मी त्यांना समजावून सांगितले . तसेच कुठले शस्त्र बाळगले आहे यापेक्षा ते कोणी बाळगले आहे हे देखील किती महत्त्वाचे आहे हे त्यांना समजावून सांगितले . विशेषतः अहिल्याबाई होळकर आणि मराठेशाहीचा इतिहास त्यांना मी सांगितल्यावर खुर्च्यांवर अस्ताव्यस्त बसलेले सर्वजण उठून उभे राहिले आणि त्यांचे अंगावर रोमांच उभे राहिले असे त्यांनी सांगितले. जोपर्यंत प्रत्येक हिंदूच्या हातामध्ये शस्त्र होते तोपर्यंत आपल्या समाजामध्ये गुन्हेगारी बलात्कार चोऱ्या माऱ्या यांना थाराच नव्हता . इथली सशस्त्र शिल्पे तेच दाखवितात . इंग्रजांनी अभ्यासपूर्वक आपल्या हातातून आपले शस्त्र आणि आपले शास्त्र हिसकावून घेतले आणि तिथून पुढे आपल्या समाजाच्या ऱ्हासाला सुरुवात झाली जो आज पावतो थांबलेलाच नाही . जोपर्यंत आपल्या आजूबाजूला फिरणाऱ्या सज्जनांच्या हातामध्ये शस्त्र दिसते आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा अपप्रकार करण्याची हिम्मत कुठल्याही दुर्जनाला होणारच नाही हे साधे सोपे गणित आपल्याला कसे कळले नाही कोण जाणे! पोलिसांचा विश्वास संपादन करून मी संपूर्ण परिसर अनिमिष नेत्रांनी पाहिला . अहिल्याबाई होळकर यांची समाधी खाली नर्मदा मातेच्या काठावर आहे असे मला सांगण्यात आले त्यामुळे पुन्हा खाली गेलो . आणि त्या समाधीपुढे साष्टांग नमस्कार घातला . मला काय झाले माहिती नाही परंतु मी त्याच अवस्थेमध्ये ढसाढसा रडलो आणि माझ्या अश्रूंनी त्या पवित्र भूमीला अभिषेक केला . जर अहिल्याबाई नसत्या तर आज आपल्या धर्माची अवस्था किती बेकार झाली असती या कल्पनेनेच अंगावर काटा येतो . अहमदनगर हे अतिशय हिडीस नाव बदलून त्या पवित्र नगरीचे नाव अहिल्यानगर करण्यात आले आहे ही गोष्ट अतिशय उत्तम झालेली आहे ! आपल्या शहरांना परकीय आक्रमकांची नावे देणे म्हणजे बाप जिवंत असताना आपल्या आईवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव बापाच्या जागी लावण्यासारखे आहे असे माझे परखड परंतु स्पष्ट मत आहे . कोणाला पटो अगर ना पटो आम्हाला त्याची फिकीर नाही .
इथे असलेली काही शिल्पे विशेष कौतुकास्पद आहेत . मराठ्यांनीच बांधलेला हा घाट असल्यामुळे मराठेशाहीचा ताकदवान हत्ती आपल्याला जागोजागी दिसतो . मराठे शाहीचे प्रतीक असलेला हा हत्ती मुसलमानी शासकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उंटाला मान मोडून चिरडत आहे अशी देखील शिल्पे येथे पाहायला मिळतात .
एका हातामध्ये जपाची माळ आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार घेतलेला साधू या शिल्पा मध्ये आपल्याला दिसतो आहे . प्रस्तुत लेखकाच्या हातामध्ये दंडाला बांधलेला धनुष्य आपल्याला दिसेल .
परंतु मला विशेषत्वाने आवडले ते नऊवारी साडी नेसून हातात धनुष्यबाण घेऊन तो ताणणाऱ्या मराठा स्त्रीचे हे शिल्प ! अशा स्त्रिया समाजात असतील तर महिला सक्षमीकरणाची वेगळी चळवळ राबवण्याची गरजच उरणार नाही .

या शिल्पातील सर्वच अलंकार पाहण्यासारखे आहेत परंतु सर्वश्रेष्ठ अलंकार हा तिच्या हातात असलेला धांदली बिल्खी अर्थात धनुष्यबाण हाच आहे ! हा पावरी भाषेतील शब्द आहे ! चला तुम्हाला महेश्वर फिरवून आणतो !
महेश्वर किल्ल्याचे प्रवेशद्वार अतिशय भव्य दिव्य आणि अप्रतिम कोरीव काम असलेले आहे .यातील मराठा सैनिकांचे वेश आणि अलंकार पाहिल्यावर आपल्याला आपले तत्कालीन पूर्वज कसे राहायचे याचा अंदाज येतो .घाटासमोर असलेले नर्मदा मातेचे पात्र अतिविस्तीर्ण असे आहे . इतका भव्य दिव्य घाट नर्मदा मातेपुढे तोकडाच भासतो .
या मंदिरांचे संवर्धन आणि जतन करणे खूप आवश्यक आहे कारण महापूर येऊन गेला की इथल्या मंदिरांवर अशी झाडे वाढून जातात .
इथल्या कमानी ,महिरपी , घंटा ,खांब , भिंती , कनाती , कळस , सज्जे सर्वच अतिशय सुशोभित आणि कोरीव कामाने युक्त असे आहे
आपल्या लोकांना राजस्थानातील किल्ले माहिती आहेत परंतु मराठ्यांनी बांधलेला हा सुंदर महेश्वर चा किल्ला आपण जवळ असून देखील पाहिलेला नसतो . शिवछत्रपतींनी धामधुमीच्या काळामध्ये मोठमोठे ओबडधोबड दगड रचून जरी रांगडे किल्ले घडवले तरी थोडेसे राजकीय स्थैर्य मिळताच मराठ्यांनी किती सुंदर शिल्प वैभव उभे केले आहे याचीच साक्ष महेश्वरचा किल्ला देतो आहे .
ज्यांना अभिजात शिल्पकलेची आणि स्थापत्य कलेची आवड आहे त्यांनी जर महेश्वर चा किल्ला पाहिला नसेल तर त्यांनी आयुष्यात काहीच पाहिले नाही असे सांप्रत आमचे स्पष्ट मत झालेले आहे . किंवा बांधकाम क्षेत्रामध्ये अथवा आर्किटेक्चर अर्थात स्थापत्य कलेमध्ये ज्यांना करिअर करायचे आहे त्यांनी एकदा तरी महेश्वरला आलेच पाहिजे .
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे हेच ते दहनस्थळ . प्रत्येक हिंदू बांधवाने इथे येऊन एकदा तरी नतमस्तक झालेच पाहिजे तरच त्याच्या जीवनाला अर्थ आहे . साक्षात नर्मदा मातेने देखील या साध्वीला आपल्या उदरामध्ये सामावून घेतले यातच तिची आणि तिच्या कार्याची महानता सामावलेली आहे .
महेश्वर किल्ल्यामध्ये असलेले रामाचे मंदिर हे विशेष सौंदर्यपूर्ण आहे
मराठ्यांवर चित्रपट आणि मालिका काढणाऱ्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी इथे एक वार येऊन मराठे कशा प्रकारची वस्त्रप्रावरणे परिधान करायचे त्याचा बारकाईने अभ्यास करावा अशी त्यांना विनंती आहे .
इथली भव्य दिव्य प्रवेशद्वारे आणि कमानी आपल्याला मराठीशाहीच्या वैभवाची साक्ष येणाऱ्या शेकडे वर्षापर्यंत देत राहतील .
इथे असलेले अजून एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे नर्मदा मातेच्या प्रवाहाच्या मधोमध स्थित असलेले बाणेश्वराचे मंदिर होय ! केवळ नावेने या मंदिरात जाता येते . अर्थातच परिक्रमावासींसाठी हे मंदिर वर्ज्य आहे परंतु मराठी स्थापत्यशास्त्राच्या अजोड सामर्थ्याचा पुरावा हे मंदिर आपल्याला देते आहे ज्याने आजवर नर्मदा मातेचे शेकडो महापूर सहज झेललेले आहेत आणि तरी देखील एकही चिरा न हलता ते अतिशय भक्कमपणे उभे आहे .
इथल्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर असलेली ही व्यक्ती शिल्पे फार सुंदर आकर्षक आणि अभ्यासण्यायोग्य आहेत
नर्मदा मातेच्या काठावर असलेली अहिल्याबाईंची समाधी आणि अन्य काही छत्र्या आपल्याला दिसत आहेत
श्री राम मंदिराच्या उत्कृष्ट स्थापत्य कलेचा परिचय देणारे हे चित्र आहे .
या चित्रामध्ये बाणेश्वराचे मंदिर नर्मदा मातेचे पाणी उतरल्यावर देखील कसे भक्कमपणे उभे आहे ते लक्षात येते
या घाटावर अनेक मंदिरे छत्र्या पाहण्यासारख्या आहेत त्याचबरोबर तटबंदी देखील लक्षात राहणारी आहे .
या चित्रामध्ये आपल्याला मुक्ताबाईंची छत्री आणि तिथे शेजारी ठेवलेल्या कार्बन फायबरच्या कयाक नौका दिसत आहेत . याच ठिकाणी व्यायाम करणारी मुले मला भेटली होती .
राम मंदिराजवळून सूर्योदय अतिशय सुंदर दिसतो
एकंदरीत किल्ल्याचा आकार आणि तटबंदी किती मजबूत आहे हे आपल्या लक्षात यावे म्हणून हे विहंगम दृश्य सोबत जोडत आहे .
घाटावर काशी विश्वनाथाचे देखील खूप सुंदर मंदिर आहे .भारतामध्ये अनेक ठिकाणी काशी विश्वनाथाची मंदिरे आहेत परंतु स्वतः काशी विश्वनाथांना ज्या मंदिरामध्ये जाऊन रहावेसे वाटेल असे हे मंदिर आहे कारण काशीच्या विश्वनाथांचा जिर्णोद्धार करणाऱ्या माऊलीने हे मंदिर बांधलेले आहे !
महेश्वर घाटावरील एक सूर्योदय
माहेश्वरी साड्या विणल्या जातात ते हातमाग
महेश्वर किल्ल्याच्या मधोमध असलेले अहिल्याेश्वर महादेवाचे मंदिर हा देखील उत्कृष्ट शिल्पकलेचा आणि मराठा स्थापत्य शैलीचा एक आदर्श नमुना आहे .
महेश्वर येथील नर्मदा मैयाचे पाणी शांत स्थिर आणि स्वच्छ आहे .
इथे असलेली एक मोठी दीपमाळ अत्यंत आकर्षक आणि पाहण्यासारखी आहे
हत्तीची अत्यंत सुंदर शिल्पे इथे चितारलेली आहेत .सांगली च्या पटवर्धन संस्थानचा बबलू नावाचा हत्ती साखळदंडांनी खांबाला कसा बांधला जायचा आणि कसा सजवला जायचा हे मी लहानपणापासून पहात आलेलो असल्यामुळे हे शिल्प किती उत्कृष्ट आहे हे पाहता क्षणी लक्षात येते ! इथे हत्ती त्याला बांधलेल्या साखळीशी खेळतो आहे तसाच बबलू हत्ती देखील खेळायचा .
राम मंदिर देखील सर्व बाजूंनी अतिशय आकर्षक आहे आणि त्याच्या बाहेर दगडी कारंजी स्थापित केलेली आहेत
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी भारतातील कुठल्या कुठल्या मंदिरांचा मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार केलेला आहे त्याची ढोबळी यादी येथे लावलेली पाहायला मिळते . ज्या काळामध्ये दळणवळणाची साधने रस्ते व गाड्या नव्हत्या त्या काळात संपूर्ण भारतभर फिरून एका विधवा महिलेने इतके मोठे कार्य केल्याची जगाच्या इतिहासात दुसरी नोंद कुठेच नसेल .
उधळलेल्या हत्तींचे हे शिल्प विशेष लक्षात राहण्यासारखे आहे . हत्तीची साखळी , हत्तीची अंबारी ,वर चढण्यासाठी लावलेली शिडी ,पाठीवरची झूल , घंटा ,वर बसलेल्या माणसांच्या हातातील चवऱ्या ,काठी , माहुत आणि हत्ती उधळल्यामुळे त्यांची उडालेली तारांबळ हे सर्वच शिल्पकाराने उत्तम रीतीने चितारलेले आहे .
महेश्वर किल्ल्याची भिंत हे देखील एक मोठे आश्चर्य आहे कारण ही भिंत दरवर्षी नर्मदा मातेच्या महापुराचा सामना करते . तरी देखील तिचा दगड सुद्धा हललेला नाही .
महेश्वर किल्ल्याचे प्रवेशद्वारे इतके भव्य दिव्य आणि चित्त वेधक आहे की ते कायमचे स्मरणात राहते ! त्याच्या पायऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत .
घाटावर फार मोठ्या संख्येने नावा असतात.आणि त्या चालवण्याचे कार्य फक्त केवट समाजाचे लोक करतात . त्यांना मिळालेला तो जन्मसिद्ध अधिकार आहे . अन्य कुणीही हे काम करू शकत नाही . अर्थात इथे अन्य जाती देखील आहेत उदाहरणार्थ कहार , मांझी ,नावडी ,मल्ला ,कीर इत्यादी परंतु हे लोक मुख्यत्वे करून मासे धरतात किंवा शेती करतात . परंतु वरीलपैकी कुठल्याही मनुष्याला जर तुम्ही काठाने चालण्याचा मार्ग किंवा पत्ता विचारला तर तुम्हाला आवर्जून योग्य मार्ग सांगितला जातो . अपवादाने सुद्धा फसवणूक केली जात नाही . इतर बाबतीत चुकीचा मार्ग सांगितला गेल्याचे किंवा मार्ग नाही असे खोटेच सांगितले गेल्याचे अनुभवाला आलेले आहे .
इथले केवट नावेने आपल्याला बाणेश्वराचे मंदिर तसेच सहस्त्रधारेपर्यंत नेऊन परत आणतात . क्वचितप्रसंगी समोरच्या शालिवाहन घाटावर देखील नेतात .महेश्वर घाटाच्या समोरच असलेल्या नावडा टोली येथे वर्षातून एकदा सर्व केवळ समाजाच्या लोकांचे जात संमेलन असते त्याला ते नटून-थटून नावेतून येतात . वर्षभर नावेतून पलीकडे सोडण्याचे दर किंवा नावेतून गाडी पलीकडे पोहोचवण्याचे दर वगैरे या संमेलनामध्ये ठरवले जातात व कसोशीने पाळले जातात .
इथे असलेले मोठे बुरुज बघण्यासारखे आहेत .
बुरुजालाच शेंदूर फासून आदिवासींनी तिथे आपले देव चितारलेले दिसतात . हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी नीट पाहिलेले आहे व योगायोगाने त्याची छायाचित्रे गुगलवर मिळाली व नंतर पुन्हा गेल्यावर मी स्वतः देखील काढली म्हणून आपल्यासाठी टाकलेली आहेत .
महादेवांची अशी शेकडो शिवलिंगे अर्थात नर्मदेश्वर येथे आपल्याला पाहायला मिळतात . आपल्या हृदयांतर्यामी अंगुष्ठमात्र ज्योतीच्या स्वरूपात राहणारे आत्मतत्त्व आपल्या विस्मरणात गेलेले असते त्याची आठवण करून देण्याचे काम ज्योतीच्या आकाराची ही ज्योतिर्लिंगे करत असतात .
इथले द्वारपालांचे शिल्प पाहण्यासारखे आहे . जोराचा वारा सुटलेला असून त्यामुळे झगा उडत असताना देखील आणि हातात काठी घेऊन पहारा देत असताना देखील त्यांचा जप सुरू आहे . नामस्मरण सुरू आहे .त्यामुळे आपली मराठा परंपरा ही मुळातच किती आध्यात्मिक होती याचेच उदाहरण हे शिल्प आपल्याला देते आहे .
किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आतून असे दिसते . पोलीस महाराज उतरत आहेत त्या राम मंदिराच्या पायऱ्या आह . .
राम मंदिराच्या बाजूने आपण जेव्हा एक मोठी घसरगुंडी सारखी तिरपी वाट चढत वर अहिल्यादेवींच्या देवघराकडे जातो तेव्हा तिथून मंदिराचे त्याच्या तटबंदीचे आणि नर्मदा मातेचे अतिशय सुंदर दर्शन होते .
देवघर एका मोठ्या वाड्यामध्ये असून त्याचे हे प्रवेशद्वार आहे
देवाचे वैभव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढविणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्वतः मात्र अतिशय साध्या अशा वाड्यामध्ये राहत असत यातूनच त्यांची महानता अधोरेखित होते .
मराठा पद्धतीप्रमाणे इथे देखील स्थानदेवता स्थापित केलेल्या आहेत .
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची खूप सुंदर मूर्ती इथे उभे केलेली आहे . या मूर्ती सोबत फोटो काढणाऱ्या बहुतांश लोकांना त्यांच्या महानतेची कल्पना खरंच असेल काय असा प्रश्न पडतो .
मराठेशाहीतल्या अनेक तोफा येथे पाहायला मिळतात .
सर्वोत्कृष्ट तेच बाळगण्याचा ध्यास घेतलेल्या मराठेशाहीच्या तोफा या चक्क इंग्रजांकडून बनवून घेतलेल्या असायच्या हे देखील आपण येथे पाहू शकतो . औद्योगिक क्रांती झालेली असल्यामुळे इंग्रजांकडे चांगल्या दर्जाचे पोलाद बनवण्याची कला होती तिचा वापर अशा रीतीने मराठे करून घेत असत .
या चित्रात उत्कृष्ट मराठा शैलीचा दरवाजा तर पहाच परंतु वाड्याच्या भिंतीची रुंदी देखील पहा in! एक ते दीड वाव मापाच्या या भिंती आहेत . एक वाव म्हणजे आपले दोन्ही हात पसरल्यावर जेवढा आकार होतो तेवढे माप .
इथे स्थानिक मार्गदर्शक अथवा 'लोकल गाईड ' लोकांचा सुळसुळाट आहे . दुर्दैवाने यातील बऱ्याच लोकांना मराठेशाहीचा खरा इतिहास अजिबात माहिती नाही त्यामुळे केवळ वरवरची माहिती देण्याचे काम ते करतात . महाराष्ट्रातील इतिहासकारांनी थोडेसे कष्ट घेऊन महेश्वरला जाऊन तिथल्या या मार्गदर्शक लोकांना मराठ्यांचा इतिहास किती जाज्वल्य आहे ते शिकवण्याची फार गरज आहे असे वाटते . देवघरातील पावित्र्य जपले जावे याची काळजी किती घेतली जाते तेच या पाटीवरून आपल्या लक्षात येईल .
एक मराठा शैलीची खिडकी अन् तिचे अप्रतिम गज
एक मराठेशाही दरवाजा
अहिल्याबाई होळकर यांचे महान विचार इथे लिहून ठेवलेले आहेत . आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट अशी की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी वरील सर्व वाक्यं शुद्ध मराठीमध्ये म्हटलेली होती .
महेश्वरच्या इतिहासाची माहिती देणारी अशी अनेक चित्रे व माहिती फलक इथे लावलेले दिसतात .
महान धुरंधर राजकारणी नानासाहेब फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांविषयी काढलेले ऐतिहासिक उद्गार हे खरोखरीच सत्य आहेत .
होळकर घराण्यातील विविध शासकांचा शासन काल आपल्याला इथे या सनावळी मध्ये पाहायला मिळेल . सन म्हणजे वर्ष , साल आणि आवली म्हणजे रांग !
महेश्वर गावामध्ये पाहण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत की तुम्हाला इथे वेळ काढूनच यावे लागेल ! इथे लावलेला गावाचा नकाशा .
याच घाटावर राजराजेश्वर मंदिर आहे . ते देखील मी पाहून आलो . दर्शन घेताना मला कल्पना नव्हती की मला रात्री मुक्कामाला इथेच यावे लागणार आहे ! या मंदिरामध्ये अहिल्याबाई नित्य पूजेला यायच्या तसेच इथे पाच हजार वर्षापासून अकरा साजूक तुपातले नंदादीप अखंद तेवत आहेत ती परंपरा देखील अजूनही चालू आहे . सहस्रार्जुनाचा वध या ठिकाणी झालेला आहे . कार्तवीर्य नावाचा हा राजा होता . चित्रात दाखवलेला मंत्र म्हटल्यावर हरवलेल्या वस्तू सापडतात असे म्हटले जाते याचा मी अनेक वेळा स्वतः अनुभव घेतलेला आहे कारण हा मंत्र मला माझ्या आजीने शिकवलेला होता .

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनाचा कालपट इंग्रजीमध्ये .
पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या जीवनाचा कालपट हिंदीमध्ये .
अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने एक खाजगी न्यास स्थापन करण्यात आलेला असून त्याच्या व्यवस्थापकांचा क्रमांक येथे पाहायला मिळेल . या ठिकाणी लिंग अर्चन पूजेचा मोठा इतिहास आहे .
महेश्वर गावाची तत्कालीन लोकसंख्या एक लाख दहा हजार होती त्या प्रत्येक प्रजाजनाचे नाव घेऊन अहिल्याबाईंनी दररोज एक हजार शिवलिंगांचे लिंग अर्चन करण्याची परंपरा सुरू केली होती . त्यासाठी १११ ब्राह्मणांची कायमची नियुक्ती केलेली होती .प्रजाजनांच्या रक्षणासाठी कल्याणासाठी आणि उत्कर्षासाठी अशा प्रकारे देवाची पूजा कुठल्या शासकाने अविरतपणे केल्याची इतिहासामध्ये फारशी नोंद पाहायला मिळत नाही .
सध्या सात ब्राह्मणांद्वारे ही पूजा केली जाते असे दिसते .
वाड्याचे प्रवेशद्वार . यातील काही भागच पर्यटकांना पाहण्यासाठी खुला आहे . काही भागात पंचतारांकित हॉटेल आहे .
महेश्वर किल्ल्यामध्ये ठेवलेली अजून एक तोफ .
एवढ्या महान साध्वी चा आणि राणीचा किती साधा वाडा आहे पहा !
इथे पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात परधर्मीय असतात . त्यांना देखील हे सर्व आपले वाटू लागेल तो खरा सुदिन !
राम मंदिर त्याच्या मागे दिसणारी नर्मदा माई आणि पलीकडे दिसणारा शालिवाहन घाट याचे प्रस्तुत लेखकाने नंतर च्या एका भेटीत काढलेले छायाचित्र
वाड्यातून दिसणारे अहिल्येश्वराचे मंदीर .
माहेश्वरी साड्यांचे हातमाग .
इथे आपल्यासमोर साडी विणून दिली जाते .
शेजारीच असलेल्या रेवा सोसायटी च्या दुकानामध्ये देखील साड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत . गावात अनेक दुकाने माहेश्वरी साड्या विकतात परंतु इथल्या साड्या अधिक विश्वासार्ह मानल्या जातात .
विक्री केंद्राचे अजून एक छायाचित्र .
साड्या कशा बनवल्या जातात त्याची माहिती इथे दिलेली आहे . विणकारांसाठी १९७९ मध्ये ही रेवा सोसायटी स्थापन झालेली असून विक्री मधून मिळणारा नफा विणकारांच्या हितासाठी वापरला जातो .
या हातमागवर फक्त महिला कारागीरच बसविल्या जातात हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे .
बाहेर लावलेल्या जाळीतून प्रेक्षक साडी बनवताना बघू शकतात .
जाळीची लांबी मोठी असून अनेक साड्या बनवणारे हातमाग आपण पाहू शकतो .
प्रकल्पाला रेवा असे नर्मदा मातेचे नाव देण्यात आलेले आहे . प्रकल्प पूर्णपणे सौरऊर्जेवर चालतो .
किल्ल्याच्या मजबूत तटबंदीचे दृश्य .
महेश्वर ची जगप्रसिद्ध दीपमाळ आणि महामूर्ख पर्यटकांनी टाकलेला प्लास्टिकचा कचरा .
राम मंदिराची उत्कृष्ट रचना व अद्भुत स्थापत्य कला .
समोरच्या बाजूने राम मंदिर काहीसे असे दिसते .
अप्रतिम महाद्वार आणि त्याचे तितकेच अप्रतिम नक्षीकाम .
दुसऱ्यांदा महेश्वरला गेल्यावर अहिल्येश्वर मंदिराचा प्रस्तुत लेखकाने काढलेला फोटो .
किल्ल्याची तटबंदी तर पहाच परंतु भारतातील प्रत्येक मंदिरामध्ये असलेली बेलबुट्टी इथे देखील काढलेली आपल्याला पाहायला मिळते !
मंदिरावरचे केवळ अप्रतिम कोरीव काम .
झुंजणाऱ्या हत्तींचे अप्रतिम शिल्प . पूर्वी हत्तींच्या मारामारीचा साठमारी नावाचा खेळ खेळवला जायचा . त्यातले हे दृश्य आहे . कोल्हापूर शहरामध्ये आजही साठमारीचे मैदान पाहता येते .
मंदिराचे सुंदर कोरीव काम असलेले प्रवेशद्वार आणि पर्यटकांची गर्दी .
चित्रकलेची स्थापत्य कलेची वास्तुकलेची कोरीव कामाची आणि बांधकामाची आवड असलेल्या माझ्या मित्रांसाठी अहिल्येश्वर मंदिराचा समोरून काढलेला फोटो .
दगडातच घडवलेले एक अप्रतिम कारंजे आणि सरदगर्मी मुळे दगडी फरशी चा होणारा अपक्षय .
महेश्वर किल्ल्याचे अप्रतिम प्रवेशद्वार आतल्या बाजूने असे दिसते .
या कोरीव कामाचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द अपुरे आहेत . खऱ्या दोरखंडात देखील कोणीही इतके सुंदर विणकाम सहजासहजी करू शकणार नाही .
आतल्या बाजूचे द्वारपाल आणि नक्षीकाम देखील पाहण्यासारखे आहे .
महाद्वार दुमजली असून इंच आणि इंच नक्षीकामाने भरलेले आहे .
इथले प्रत्येक शिल्प वेगळे अप्रतिम सुंदर आणि पाहण्यासारखे आहे .
डावीकडचे दार राम मंदिराचे आहे आणि सरळ जाऊन डावीकडे गेल्यावर राजवाडा लागतो . उजवीकडे गेल्यावर राज राजेश्वर मंदिर लागते .
मराठा शैलीच्या बांधकामाचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे .
कमानी ,खिडक्या ,महिरपी हे मराठा शैलीतील बांधकामाचे वैशिष्ट्यपूर्ण भाग येथे पदोपदी दिसतात .
प्रत्येक वास्तु मंत्रमुग्ध करून टाकणारी आहे .
समाज माध्यमांवर रिल्स बनवणाऱ्यांसाठी तर हा किल्ला म्हणजे स्वर्ग आहे . जागोजागी असे खूप सारे युट्युबर आणि रील बनवणारे पाहायला मिळाले .
या महिरपीचे नक्षीकाम आणि त्यावरील दगडाची पोकळ जाळी पहा !
किल्ल्याची बाहेरची बाजू तर अधिकच आकर्षक आणि सुंदर आहे.
इथे असलेल्या असंख्य खिडक्या आणि त्यांच्या महिरपी तसेच बाहेर आलेले सज्जे फार सुंदर आहेत .
विशेषतः किल्ल्याच्या पायऱ्या बनवण्यासाठी घेतलेली मेहनत लक्षात येण्यासारखी आहे .
काटेकोर भूमिती वापरून बनविलेल्या या पायऱ्या पाहता क्षणीच कोणालाही इथे उभे राहून फोटो काढण्याचा मोह होतोच होतो !
याच ठिकाणी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण देखील झालेले आहे . नर्मदा परिक्रमेवरील रेवा या गुजराती चित्रपटांमध्ये देखील हा घाट पाहायला मिळतो .
इथे तत्काळ फोटो काढून देणारी माणसे उपलब्ध असतात . अगदी माझ्या आजीचा पन्नास वर्षांपूर्वी याच पायऱ्यांवर बसलेला फोटो देखील पाहिल्याचे मला स्मरते . कारण तेव्हा माझा मामा सागर ला रहात असे .याचा अर्थ तेव्हा देखील असे तावत्काळ भांकालेखक अथवा इन्स्टंट फोटोग्राफर होते .
अतिशय उत्कृष्ट शैलीतली ही इमारत म्हणजे प्रत्यक्षामध्ये नर्मदा मातेच्या पुरापासून किल्ल्याचे संरक्षण करणारी एक अजोड अभेद्य अद्वितीय तटबंदी आहे !
एखादा बुरुज सुद्धा किती सुंदर असू शकतो याचे उदाहरण देणारा हा महेश्वर चा बुरुज !
निर्विवादपणे हा जगातील सर्वात सुंदर घाट आहे परंतु या घाटाचे मोठेपण या सौंदर्यामध्ये लपलेला नसून हा घाट सर्वश्रेष्ठ बनवणारी अजून एक वास्तू तिथे आहे .
ती वास्तू म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची समाधी
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पार्थिवाचे दहन नर्मदे काठी ज्या ठिकाणी झाले तेथेच त्यांची छोटीशी समाधी बांधण्यात आलेली आहे .
इथे खरं पाहायला गेलं तर फार मोठे समाधी मंदिर व्हायला हवे होते . परंतु सध्या असलेले मंदिर अतिशय छोटेखानी आहे आणि ते तिथे आहे याची देखील कल्पना पर्यटकांना नसते असे सहज लक्षात येते .
स्वतः अहिल्याबाई यांनीच आपले समाधी मंदिर मोठे करू नये असे सांगून ठेवल्या शिवाय हे असे होणे शक्यच नाही .
साधी विचार करण्यासारखी गोष्ट आहे . आपले जावई यशवंतराव फणसे यांचे निधन झाल्यावर सती गेलेली कन्या मुक्ताबाई हिचे एवढे भव्य दिव्य समाधी मंदिर जे होळकर बांधू शकतात ते अहिल्याबाईंची किती मोठी समाधी बांधू शकले असते !
या समाधी मंदिरापुढे गेल्या वर्षी पुन्हा गेलेलो असताना मला ही एक कुब्जा म्हातारी सायंकाळच्या सुमाराला दिसली होती .
जी नंतर अचानक अदृश्य झाली ! आणि पायरीवर बसून आम्ही मित्रांनी काढून घेतलेल्या 'इन्स्टंट फोटोमध्ये ' मागे पुन्हा एकदा ती दिसते आहे असे आम्हाला लक्षात आले ! गंमतच आहे सगळी !

ही पहा ती म्हातारी डावीकडे दिसते आहे ! मध्ये बसलेला प्रस्तुत लेखक आणि त्याचे मित्र . (परिक्रमे नंतर गतवर्षी काढलेला फोटो )
किल्ल्याच्या भव्यतेपुढे अहिल्याबाईंची छत्री किती लहान दिसते आहे पहा ! जे दिसण्यावर जातात किंवा भाळतात त्यांना अहिल्याबाई सारख्या लोकोत्तर महापुरुषांची योग्यता कळणे कदापि शक्य नाही !
महेश्वर घाटाचे व येथील छत्र्यांचे अजून एक दृष्य
अशी अनेक छोटी छोटी कुंडे तीर्थे तिथे आहेत .
किल्ल्यामध्ये एक मोठेच पंचतारांकित हॉटेल आहे .
घाट मोठा सुंदर आणि मजबूत आहे . घाटाचे दगड सुटकू नयेत म्हणून प्रत्येक दगड वेगळ्या आकाराचा आहे .
पाणी अत्यंत खोल असल्यामुळे इथे पुढे जाता येणार नाही अशा पद्धतीच्या जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत .
घाट चांगला लांबरुंद व खोल आहे .
घाटावर अक्षरशः शेकडो मंदिरे आहेत व लहानातले लहान मंदिर देखील कोरीव कामाने सजविण्यात आलेले आहे .
शिस्तबद्ध पद्धतीने लावलेल्या आधुनिक नौका आपल्याला घाटाच्या सुरुवातीलाच दिसतात
मासेमारीसाठी आणि स्थानिक लोकांना ने आण करण्यासाठी वापरले जाणारे डोंगे देखील पाहायला मिळतात .
तसेच पर्यटकांना फिरवून आणण्यासाठी सजविलेल्या आधुनिक नावा देखील दिसतात .
या दोन्ही प्रकारच्या नावांच्या मधोमध असलेली गतिमान नौका अथवा स्पीड बोट देखील आजकाल पाहायला मिळते .
मुक्ताबाईंच्या छत्रीच्या इथे असलेला हा सज्जा बाहेरून पाहिल्यावर मला खूपच आवडला .
छत्रीचे प्रवेशद्वार देखील आकर्षक व मोठे आहे
दारू पाजणाऱ्या हिंदू स्त्रीशी लगट करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांचे शिल्प येथे कोरलेले दिसते आहे . अशा रीतीने शत्रू पक्षाकडून गुप्त बातम्या काढण्याची पद्धत जुनी आहे ज्याला आजकालच्या भाषेमध्ये हनी ट्रॅप म्हणतात .
समोरच महादेवाचे मंदिर आहे . दगडी मूर्तींवरील अलंकार वगैरे बारकावे अतिशय सुंदरतेने कोरण्यात आलेले आहेत व अभ्यासकांसाठी पर्वणीच ठरावी असे आहेत .
इथे तटबंदी मध्येच असलेल्या मद्रासी बाबांच्या आश्रमामध्ये मी गेलो आणि याच सज्जामध्ये बसून याच ठिकाणी त्यांनी मला सुंदर अशी नरसूची कॉफी पाजली !
परिक्रमेमध्ये अर्थातच माझ्याकडे कॅमेरा नव्हता परंतु पुन्हा गेल्यावर मात्र मी मद्रासी बाबांचा फोटो आवर्जून काढून घेतला त्यांचे दर्शन आपल्याला घेता यावे म्हणून सोबत तो फोटो जोडत आहे .
अहिल्यादेवींचे हे चित्र लहानपणापासून पाहत आलो आहे परंतु त्यात मागे दिसणारी वास्तू म्हणजे महेश्वर चा किल्ला आहे हे इथे आल्यावर कळाले ! मद्रासी बाबांनी दरवाजाच्या गणेशपट्टीवरच हे चित्र लावलेले असल्यामुळे जाताना आपोआपच त्यांना नमस्कार केला जातो !
मद्रासी बाबा नेहमी या कोपऱ्यात याच खुर्चीवर असे बसून राहिलेले असतात .
तिथे बसल्या बसल्या त्यांना नर्मदा मातेचे अतिशय सुंदर असे दर्शन होत राहते .
नर्मदा मातेचे पाणी कधी कधी थेट या सज्जा ला करते परंतु आत शक्यतो येत नाही असे बाबांनी मला सांगितले .
मद्रासी बाबा नागा साधू आहेत .
सालंकृत मराठी श्री चे अतिशय सुंदर शिल्प इथे आहे जे दुर्दैवाने मूर्ती भंजकांनी तोडलेले आहे .
प्रत्येक कोपऱ्यावर एक असे शिल्प आहे की जे दोन्ही बाजूने बघता येते .
वीणा वाजवणाऱ्या स्त्रीचे शिल्प
गेल्या वर्षी पुन्हा एकदा घाटावर गेलेलो असताना त्याच शस्त्रधारी साधू सोबत काढलेले चित्र
तीच धनुर्धारी मराठी ललना
तीच मुक्ताबाई फणसे यांची समाधी . याच कट्टयावर तरुण व्यायाम करीत होते .
सहस्रधारा भेदून जाणाऱ्या कार्बन फायबर पासून बनविलेल्या मजबूत कयाक नौका
केस विंचरणाऱ्या मराठी स्त्रीचे शिल्प ! यातील कंगव्याचे एक अन् एक दात आणि एक अन् एक केस दगडावर कोरलेला आहे !
मराठी "राझी " अर्थात महिला गुप्तहेर
वास्तुंवर वाढलेले गवत व झाडे तिचे आयुर्मान कमी करतात . तितकी काळजी घेणे मात्र अत्यंत आवश्यक आहे .
एक अन्य मराठा शैलीचे महाद्वार
म्हशीला मारणाऱ्या सिंहाचे शिल्प व द्वार पाल
विजार घातलेला द्वारपाल व अन्य सुरेख शिल्पे
डोक्याचा फेटा , उपरण्याच्या चुण्या , कंबरेची कट्यार अन्य अलंकार व काठी हे सर्व एका दगडात कोरलेले आहे व जिवंत आहे !
मला मद्रासी बाबा नी कॉफी पाजली तो सज्जा
इतक्या सुंदर घाटाचे आम्ही चालवलेले विद्रुपीकरण
घाटावर अशी शेकडो शिवलिंगे आहेत . जाता येता कोणीही त्याची पूजा करते .
मुक्या जनावरांना व छोट्या पक्ष्यांना पाणी पाजणारी अशी वृंदावने देखील आहेत .
एका शिवपिंडी नजीक निवांत पहुडलेले भैरव !
थेट मैय्याचे पाणी दूषित करताना स्थानिक ग्रामस्थ मातराम
शेकडो महापूर झेलून ही मंदिरे ताठ मानेने उभी कशी याचे उत्तर आपल्याला पोलादाच्या या सुंदर कड्या देतात ज्या दोन दगडांना सांधून व एकत्र बांधून ठेवतात . मी देखील मंदिरांची बांधकामे करताना या तंत्राचा भरपूर वापर केलेला आहे .
मातंगेश्वर घाट व त्याच्या अफलातून पायऱ्या
जिथे नसावीत तिथली झाडे मानव तोडत नाही व नको तिथे मात्र बेसुमार वृक्षतोड करतो .
मी असाच या काठाकाठाने चालत होतो

कॉफी पीत पीत नर्मदा माईचे दर्शन घेतले
भव्य सज्जाच्या ह्या सुंदर महिरपींचे कोरीवकाम डोळ्यात साठवले
राजवाड्या नजिक आलो
आणि ह्या अप्रतिम पायऱ्या चढत राजराजेश्वराचे मंदिर गाठले
याही मंदिराचा परिसर भव्य दिव्य सुंदर आणि पाहण्यासारखा आहे .
इथेच गेली पाच हजार वर्षे तुपाच्या ११ ज्योती अखंड तेवत आहेत .
महेश्वरच्या या सुंदर घाटाचा आपल्याशी अजून एक प्रकारे संबंध येतो .
आपल्याला माहितीच आहे त्याप्रमाणे नर्मदा माईत मी कधीच लाथा मारत पोहलेलो नाही . कायम असा हात पाय न मारता पडून राहिलेलो आहे .
परंतु एक डिसेंबर २०२३ रोजी मात्र माझी मती कशी काय फिरली माहिती नाही आणि याच ठिकाणी नर्मदा मातेला नित्याप्रमाणे साष्टांग नमस्कार केल्यावर मित्रांच्या अति आग्रहाखातर मी नर्मदा मातेमध्ये एकच उडी मारली आणि त्यात माझ्या कंबरेचा अस्थिभंग होऊन मी सात आठ महिने अक्षरशः एका जागी पडून राहिलो !
कधी एक साधा ओरखडा सुद्धा मला न दिलेल्या नर्मदा मातेने असे एका जागी पडून राहण्यास लावले आणि त्यातूनच माझी नर्मदा परिक्रमा या उपक्रमाचा जन्म झाला . पडल्या पडल्या परिक्रमेच्या वह्या स्वतःच्या आनंदासाठी चाळत असताना असे लक्षात आले की त्या फाटू लागल्या आहेत म्हणून त्या सुरक्षित रहाव्यात म्हणून त्याचे रूपांतर डिजिटल स्वरूपात अर्थात एका ब्लॉग मध्ये करण्याची बुद्धी नर्मदा मातेने दिली . व ते लिखाण अलिकडेच दृष्टी मांद्य प्राप्त झालेले माझे शतायुषी थोर चित्रकार काका श्री विष्णू सखाराम कुलकर्णी यांना ऐकवण्यासाठी सुरू केलेल्या रेकॉर्डिंग ठेवायला मोबाईलवर जागा पुरत नसल्यामुळे ते युट्युब वर टाकायला सुरुवात झाली असो .
महेश्वर किल्ल्याचे सर्व दरवाजे रात्री कुलुप बंद केले जातात .त्यामुळे मी रात्रीचा मुक्काम राजराजेश्वर मंदिरामध्ये केला . इथे महेश्वर शहरातच राहणारे एक साधू येऊन जाऊन सेवा देत असत . माझ्या एकट्या करता त्यांनी सर्व स्वयंपाक करून ठेवला आणि रात्री घरी गेले . भोजन प्रसाद घेऊन मी राज राजेश्वर मंदिरामध्ये जाऊन बसलो . इथे गेली पाच हजार वर्ष तुपाच्या अखंड ११ ज्योती चालू आहेत त्यामुळे मंदिरातले वातावरण अतिशय शुद्ध व पवित्र असल्याचे लगेच जाणवते . ही खरे तर कार्तवीर्य नावाच्या राजाची नगरी होय . या सोमवंशीय राजाला ५०० राण्या होत्या असे म्हणतात . आपल्याकडे अलंकारिक भाषा वापरण्याची पद्धत प्रचलित आहे . या राजाच्या मागे ५०० राण्यांचे पाठबळ असल्यामुळे हजार हात याच्या सोबत आहेत अशा अर्थाने याला सहस्रबाहु राजा म्हटले जात असावे असे सांप्रत प्रस्तुत लेखकाचे मत आहे . त्यामुळे हजार हातांचा हा राजा होता वगैरे दंतकथा मानाव्यात . हा राजा इतका पराक्रमी होता की त्याने रावणाचा देखील पराभव केलेला होता ,त्यामुळेच महेश्वर नगरात रावणेश्वर महादेवाचे देखील मंदिर दिसते . सकाळी लवकर उठून मी पुन्हा एकदा सर्व दर्शने करत पुढे प्रस्थान ठेवले कारण मंडन मिश्रा आणि त्यांची पत्नी भारती यांचा शंकराचार्यांबरोबर जिथे शास्त्रार्थ झाला होता ती जागा मला बघायची होती . या जागेचे वैशिष्ट्य असे होते की हे जगातले सर्वात पहिले शिवलिंग मानले जाते ! ओम नमः शिवाय ! हर हर महादेव ! हर हर नर्मदे ! नर्मदे हर !
लेखांक एकशे एक्केचाळीस समाप्त ( क्रमशः )
नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर 🙏🙏🙏 अप्रतिम, अलौकिक ❤
उत्तर द्याहटवानर्मदे हर
उत्तर द्याहटवानर्मदे हर
उत्तर द्याहटवामंदार