लेखांक ३१ : जंगलात मुक्काम आणि अपरात्री आलेला अनुभव
परस्तेने सांगितल्याप्रमाणे मी कुठे मोकळे आकाश दिसते आहे का ते शोधत चालू लागलो . परंतु ते अरण्य इतके घनदाट होते की आकाश दिसतच नव्हते . एव्हाना अंधार पडायला सुरुवात झालेली होती . अरण्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती . अखेरीस मला एक जागा सापडली जिथे मुक्काम करावा अशी आतून प्रेरणा झाली . अमरकंटकच्या जंगलातील नर्मदा मातेचे संग्रहित चित्र आत्ता गुगल मॅप वर मी ती जागा शोधून काढली आहे , ती साधारण अशी होती . चित्रात अंधारी रेषा दिसत आहे ते नर्मदेचे पाच दहा फुटाचे पात्र आहे . ह्या घोर जंगलातून शक्यतो जाऊ नका असे नर्मदा परिक्रमा विषयक पुस्तके देखील आवर्जून सांगतात . इथे फार काही मोकळी जागा नव्हती परंतु थोडीशी सपाटी जाणवली . या भागातील झाडी इतकी दाट आहे की तुम्हाला खरोखरच आकाश दिसत नाही .डिस्कवरी चैनल वर येणाऱ्या मॅन वर्सेस वाइल्ड मध्ये बेअर ग्रील्स हा माजी इंग्लिश सैनिक जसे जंगलात मुक्काम करतो तसे काहीतरी मला करायचे होते . आता मला एखादी तात्पुरती कुटी उभी करायची होती .माझ्याकडे एक दंड होता . तेच माझे एकमेव हत्यार होते . जास्ती आवाज करून देखील चालणार नव