पोस्ट्स

avadhootananda लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

• लेखांक १ : नर्मदे हर !

इमेज
नर्मदे हर ! परमहंस परिव्राजकाचार्य श्री अवधूतानंद महाराज अर्थात पूर्वाश्रमीचे श्री जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेले नर्मदे ss हर हर हे पुस्तक वाचल्यापासून नर्मदा जलाचा खळखळाट कानाला रुंजी घालत होता .कृष्णमेघ आणि चैतन्य हे त्यांचे दोन्ही चिरंजीव मुलखाचे अवलिया आणि कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यामुळे खात्री होती की पुस्तकातले अनुभव बऱ्यापैकी अद्भुत आणि सत्य असणार . माझ्याकडे नर्मदे हर या पुस्तकाची स्वतः कुंटे यांनी स्वाक्षरी केलेली प्रत आहे ! प.प. अवधूतानंद महाराज ( पूर्वाश्रमीचे श्री जगन्नाथ कुंटे ) अवधूतानंद स्वामी यांची स्वाक्षरी असलेली प्रत परंतु खरे सांगायचे तर त्यातील काही गोष्टी ह्या अतिरंजीत आहेत असे मला विनाकारण वाटायचे .तसेच त्यांनी पुस्तक मेधा पाटकर यांना अर्पण केले होते ते देखील मला मान्य नव्हते , कारण मी माझ्या महाविद्यालयीन जीवनात मेधा पाटकर यांच्याबरोबर जवळून काम केलेले होते व त्यांच्या कामाचे "खरे गमक" मला पक्के उमगल्यामुळे मी त्या कामातून बाहेर पडलो होतो .  त्यांची बाकीची अनेक पुस्तके देखील मी वाचली आहेत . परंतु नर्मदे हर या पुस्तकातील त्या...