पोस्ट्स

पाटण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ४० : स्वर्गीय सहस्रधारा आणि पाटणचे भयाण जंगल

इमेज
सूर्यकुंडामध्ये गायलेल्या रामायणाचे स्वर कानामध्ये रुंजी घालत होते . एक एक चौपाई म्हणत पावले टाकत होतो . त्या नादातच सकवाह गाव पार केले .त्यानंतर पूर्व मंडला गाव संपले आणि समोर बंजर अथवा बंजारा नावाची नदी आडवी आली . इथे ते आजोबा आणि बनकर काका नदी पार करण्यासाठी थांबलेले दिसले . नदी खोल होती आणि तिच्यावर या टोकापासून त्या टोकापर्यंत एक फुटभर व्यासाचा लोखंडी पाईप टाकलेला होता . गमतीचा भाग म्हणजे या लोखंडी पाईप वरून चालतच नदी पार करावी लागत होती . नदीचे पात्र सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचे होते . चार पावले लोखंडी पाईप करून चालणे वेगळे आणि इतके अंतर चालणे वेगळे .या नळ्यावरून चालताना पाय सटासट सटकत होते . आधी थोडेसे उथळ पात्र असल्याने पाण्यातून चालत आल्यामुळे पादत्राणे भिजलेली असत .त्यामुळे पाईप ओला होऊन गुळगुळीत पृष्ठभागावरून अधिकच सटका सटकी होत असे .मी देखील चालताना मला एका क्षणी अशी भीती वाटू लागली की माझा तोल जाणार आहे ! मी विचार केला की जर माझी ही अवस्था होत आहे तर या दोन वयोवृद्ध माणसांची कशी अवस्था होत असावी ? ते काही नाही . या दोघांना नदी पार करायला लावून मगच आपण पलीकडे जायचे असा निश