पोस्ट्स

कोकाटोला लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ४० : स्वर्गीय सहस्रधारा आणि पाटणचे भयाण जंगल

इमेज
सूर्यकुंडामध्ये गायलेल्या रामायणाचे स्वर कानामध्ये रुंजी घालत होते . एक एक चौपाई म्हणत पावले टाकत होतो . त्या नादातच सकवाह गाव पार केले .त्यानंतर पूर्व मंडला गाव संपले आणि समोर बंजर अथवा बंजारा नावाची नदी आडवी आली . इथे ते आजोबा आणि बनकर काका नदी पार करण्यासाठी थांबलेले दिसले . नदी खोल होती आणि तिच्यावर या टोकापासून त्या टोकापर्यंत एक फुटभर व्यासाचा लोखंडी पाईप टाकलेला होता . गमतीचा भाग म्हणजे या लोखंडी पाईप वरून चालतच नदी पार करावी लागत होती . नदीचे पात्र सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचे होते . चार पावले लोखंडी पाईप करून चालणे वेगळे आणि इतके अंतर चालणे वेगळे .या नळ्यावरून चालताना पाय सटासट सटकत होते . आधी थोडेसे उथळ पात्र असल्याने पाण्यातून चालत आल्यामुळे पादत्राणे भिजलेली असत .त्यामुळे पाईप ओला होऊन गुळगुळीत पृष्ठभागावरून अधिकच सटका सटकी होत असे .मी देखील चालताना मला एका क्षणी अशी भीती वाटू लागली की माझा तोल जाणार आहे ! मी विचार केला की जर माझी ही अवस्था होत आहे तर या दोन वयोवृद्ध माणसांची कशी अवस्था होत असावी ? ते काही नाही . या दोघांना नदी पार करायला लावून मगच आपण पलीकडे जायचे असा निश...