पोस्ट्स

हर्रा टोला लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ३७ : घनदाट जंगलातली चाल आणि नर्मदा बुढी माय संगम

इमेज
दिंडोरी शहरांमध्ये फारसे काही पाहण्यासारखे नव्हते . आणि इथला एकूण बकालपणा अस्वस्थ करत होता त्यामुळे लवकरात लवकर तिथून पुढे निघालो . इथे संघसंचलित इमलय कुटी नावाचा एक आश्रम आहे . बळीराम जाधव ला तो आश्रम बघायचाच होता . परंतु बाहेरून आश्रमाला कुलूप होते आणि आत मध्ये वनवासी मुले खेळत बसली होती . मी दारापाशी जाऊन चौकशी केली परंतु लॉकडाऊनमुळे आश्रम उघडणार नाही असे सांगण्यात आले . त्यामुळे त्या आश्रमाबाबत अधिक माहिती घेण्याची आमची संधी हुकली . संघ संचलित इमलय कुटी वनवासी आश्रमातील विद्यार्थी ( संग्रहित छायाचित्र ) इथून पुढे काठा काठा ने चालण्याचा मार्ग बंद झाला . दिंडोरी गावानंतर नर्मदा मैया चक्क ९० अंशाचे वळण घेत काटकोणात वळते .या भागातून कोणीच परिक्रमावासी जात नाही असे आम्हाला जागोजागी सांगण्यात आले .पुढचा मुक्काम देखील जवळपास कुठे नव्हता .त्यामुळे भरपूर चालायची तरी ठेवा असे सर्वजण सांगत होते . त्यामुळे पायांनी गती घेत निघालो . मध्ये एका पेट्रोल पंपाजवळ एका ब्राह्मणाचा धरम काटा अर्थात वे ब्रिज होता . त्याच्यावरती भरलेल्या ट्रकचे वजन केले जात असल्यामुळे याची अचूकता साधारण पाच किल...