पोस्ट्स

सियाराम बाबा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ७३ : तेली भट्याण चे महातपस्वी परमपूज्य सियाराम बाबा

इमेज
दुपारच्या वेळी बकावा गाव सोडले आणि नर्मदा मातेचा किनारा पुन्हा एकदा पकडला . काठाने चालताना खूप आनंद मिळत होता . इथे पावला पावलाला दगडांचा खच पडला होता . परंतु इथे कोणी त्याला दगड म्हणत नाहीत . तर शंकर स्वरूप म्हणून या दगडांकडे पाहिले जाते . बरेच अंतर चालल्यावर मर्दाना नावाचे गाव आले . त्या गावामध्ये मी काठाने चालत असताना एक मनुष्य नावेतून उतरला आणि माझ्याशी बोलू लागला . मी कुठून आलो कुठे चाललो आहे वगैरे चौकशी करू लागला . त्याने सांगितले की वरती लक्ष्मणदास महाराजांचा आश्रम आहे तिथे थोडी विश्रांती घेऊन मग पुढे जावे .  हरिहर कुटी आश्रम मर्दाना तो नर्मदेचा आदेश मानून मी त्याच्याबरोबर आश्रमामध्ये गेलो . आश्रम अतिशय सुंदर होता . भरपूर झाडी होती . अनेक मंदिरे होती . निवासाची उत्तम व्यवस्था होती .तिथे आधीच अवधूत फरले आणि छोटा बंगाली वगैरे येऊन बसलेले होते . सर्वजण झोपायच्या तयारीत होते . इतक्या तिथे कुठून तरी दहा-बारा छोट्या मुली प्रकट झाल्या ! मी त्या सर्वांना ओळीने नमस्कार केला ! प्रत्येकीने माझ्या डोक्यावर हा ठेवून मला आशीर्वाद दिला ! नंतर त्या मुली माझ्याशी खेळू लाग