पोस्ट्स

नर्मदा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

इमेज
ग्वारी घाटा विषयी दोन शब्द लिहिल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही ! नर्मदा मैया च्या काठावर जितके म्हणून घाट दुतर्फा आहेत त्यातील सर्वात मोठा , सर्वात लांब व सर्वात व्यग्र घाट म्हणजे जबलपूर येथील ग्वारी घाट होय . इथे नर्मदा नदीचे भव्य दिव्य स्वरूपामध्ये दर्शन होते . जयपुर येथील लाल दगडातून बांधलेला औरस चौरस पसरलेला हा घाट अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे . जबलपूर महानगरपालिका या घाटाची विशेष काळजी घेते . पार्वती मातेने अर्थात गौरीने इथे तपश्चर्या केली म्हणून खरे तर या घाटाचे नाव गौरी घाट असे आहे परंतु स्थानिक लोकांनी त्याचा अपभ्रंश करून ग्वारी अथवा गुवारी घाट असे नाव रूढ केले आहे . इथल्या लोकांनी सरकारला निवेदन देऊन या घाटाचे नाव पुन्हा एकदा गौरी घाट करावे असे सुचविलेले आहे . घाटाची लांबी इतकी आहे की चालून चालून मनुष्य कंटाळतो परंतु घाट संपत नाही . आणि इतका लांब घाट असून देखील प्रत्येक फुटावर कोणी ना कोणी नर्मदा नदीमध्ये स्नान करताना तुमच्या दृष्टीपथास पडते . या घाटावर नेहमीच गर्दी राहते . घाटावर अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत .   ग्वारी घाटावरून समोर दिसणारा गुरुद्वारा आणि