पोस्ट्स

कपिलधारा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक २९ : दूधधारे पाशी भेटलेला अलौकिक साधू

इमेज
आजची चाल मोठी आव्हानात्मक होती .गीता स्वाध्याय मंदिरातून निघेपर्यंत अर्धा दिवस उलटून गेला होता. आणि पुढे जंगलची वाट सुरू होणार असल्यामुळे पायांना प्रचंड गती देणे अतिशय आवश्यक होते . कारण अंधार पडायच्या आत मला रामदास बाबांची ज्ञानेश्वरी कुटी गाठायची होती . परंतु अमरकंटक मधून वाहणारी नर्मदा माता इतकी सुंदर आहे की तिचे रूप पाहताच बसावे असे वाटते ! नर्मदा कुंडातून बाहेर पडल्या पडल्या नर्मदा माता पुन्हा थोडीशी लहान होते आणि थोड्याच अंतरावर घातलेल्या एका मोठ्या बंधाऱ्यामुळे एक विशाल स्वरूप धारण करते . असे छोटे मोठे अनेक बांध अमरकंटक च्या हद्दीमध्ये आहेत . इथे चांगले पक्के घाट बांधलेले असून त्या घाटावरती भाविकांची आणि स्थानिक लोकांची बऱ्यापैकी वर्दळ असते . उगमाचेच स्थान असल्यामुळे पाणी इतके स्वच्छ सुंदर आणि नितळ आहे की विचारू नका ! ज्याप्रमाणे एक दोन वर्षांची बाळे ही अतिशय तेजस्वी सुंदर आणि गोड दिसतात तशी ही नुकतीच जन्माला आलेली नर्मदा राणी दिसत होती ! तिचे ते रूप डावलून पुढे जाणारा कमनशिबीच म्हटला पाहिजे ! त्यामुळे मी अगदी किनारा पकडून काठाकाठाने चालू लागलो . या भागात नर्मदा टप्प्याटप्प्याने

लेखांक २६ : विदेही संत मीरा माई ने केलेला चमत्कार !

इमेज
कपिलधारा हे स्थान अतिशय मनोहर आहे .   उंच मेकल पहाडावरून नर्मदा मैया येथे अचानक खोल दरीमध्ये झेप घेते .  कपिलधारा जलप्रपात   केवळ चार ते पाच फूट रुंदीचे नर्मदा मातेचे पात्र मेकल पर्वतावरून झेपावते . अलीकडच्या काळामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये या पाण्याची पातळी फारच कमी होते . आणि पावसाळ्यात मात्र हे पाणी भरभरून वाहते . चातुर्मासात वाहणारी कपिलधारा कपिलधारेच्या थोडेसे अलीकडे दूध धारा म्हणून एक छोटासा प्रपात आहे . या स्थानाविषयी अनेक आख्यायिका आहेत . इथून पूर्वी दुधाची धार निघायची असे काही साधू सांगतात . तर भूगर्भ शास्त्रीय नियमानुसार चुनखडक अधिक असेल तर पांढऱ्या रंगाचे फेसाळ पाणी निघू शकते . पुढे अनेक ठिकाणी मला अशा दूध धारा दिसल्या . दूधधारेच्या जवळ काही ध्यान गुफा देखील आहेत . ध्यान गुफा दूध धारा दूध धारा दुर्वास ऋषींची ध्यान गुफा इथे परिक्रमा खंडित होऊ नये म्हणून परिक्रमा मार्गाचे फलक जागोजागी लावलेले आहेत . कपिलधारेकडे जाणारा वन मार्ग खालून कपिलधारा अशी दिसते

लेखांक २५ : जंगल मे मिल, तुझे काट डालूँगा ।

इमेज
नर्मदेतील सर्व प्लास्टिकचा कचरा गोळा करून झाल्यावर मी त्या निर्मळ , नितळ पाण्यामध्ये आकंठ स्नान केले ,उपासना केली आणि प्रचंड थंडीचा अनुभव घेत बसून राहिलो . आज मी संक्रांतीच्या उत्तर पर्वावर साक्षात अमरकंटकच्या प्रवेशद्वारातून आत शिरत नर्मदा मातेमध्ये पुन्हा एकदा मंगल स्नान केले होते याचा आनंद वाटत होता ! दिवसभरात अजून काही परिक्रमा वासी त्या कुटीमध्ये मुक्कामासाठी आले . अमरावतीचा एक परिक्रमावासी होता . हा चित्रकार होता. जी डी आर्टस झालेला होता . आळंदी मधील दोन वारकरी विद्यार्थी होते .नाशिक मधला चिडका बाबा देखील पोहोचला होता . अचानक भर दुपारी हुतात्मा भगतसिंगांसारखा दिसणारा एक सहा फुटी उंचापुरा धिप्पाड साधू प्रकट झाला . त्याने कमरेला छोटीशी काळी लुंगी गुंडाळली होती . अंगावरती काळे पांढरे चट्टे पट्टे असलेले ब्लॅंकेट होते . डोक्याला पटका होता . भस्म विलेपित शरीर डोक्यावर जटा आणि नजरेत भरेल इतपत पिळदार देहयष्टी !हा चित्र विचित्र हातवारे करून स्वतःशीच असंबद्ध बडबड करत असे .तसेच अखंड गांजा पीत होता .  त्या साधूची प्रकृती साधारण अशी होती (संग्रहित चित्र )  मी भजनात बंगाली खोळ वाजव