पोस्ट्स

Narmada parikrama लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अनुक्रमणिका

अनुक्रमणिका (जे प्रकरण वाचायचे आहे त्याच्यावर क्लिक करा . तसेच हे लिखाण अजून पूर्ण झालेले नाही त्यामुळे नवीन लेखन वाचण्याकरिता पुन्हा पुन्हा भेट देत राहणे ही प्रार्थना !) ० नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी १ लेखांक एक : नर्मदे हर २ लेखांक दोन : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात ३ लेखांक तीन : चोराची धन ४ लेखांक चार : झूठा कही का ! सब कुछ तो लाये हो ! ५ लेखांक पाच : ग्वारी घाट जबलपूर मध्य प्रदेश ६ लेखांक सहा : झुलेलाल आश्रम ग्वारी घाट ७ लेखांक सात : नाभिकाने केलेला जाहीर _ मान ८ लेखांक आठ : जो तेरा संकल्प वही मेरा संकल्प ९ लेखांक नऊ : इंदोरी पोहे आणि गरमागरम जिलेबी १० लेखांक दहा : या स्वामी जेवायला ११ लेखांक अकरा : पहिला मुक्काम १२ लेखांक बारा : वेश धरावा बावळा १३ लेखांक तेरा : दत्तप्रभूंची इच्छा १४ लेखांक चौदा : सकरी गावचा लम्मू लाल विश्वकर्मा १५ लेखांक पंधरा : अखंड भारताचे नाभीस्थान १६ लेखांक सोळा : प्रभूजी का भंडार १७ लेखांक सतरा : कोल्ह्याने शिकविलेला धडा १८ लेखांक अठरा : मुंडा महारण्यामध्ये प्रवेश १९ लेखांक एकोणीस : अखेर किनारा सापडला २० लेखांक वीस : नर्मदेने खास पाठविलेला साधू २१ लेखांक एकव

लेखांक ३३ : अमेरिकन प्राध्यापक परिक्रमावासी आणि शैला आदिवासी नृत्यकार

इमेज
गरमागरम काळा चहा पिऊन थोडीशी तरतरी आली होती ती जराही न दवडता वेगाने चालायला लागावे म्हणजे शरीरामध्ये उष्णता निर्माण होईल असा विचार मी केला . आणि पटापट पूजा अर्चा आटोपून झोळी उचलली . म्हातारीने दिलेला झाडपाला देखील सोबत घ्यावा लागला . आश्रमाच्या बाहेर आल्यावर मी विचार केला आता हे ओझे घेऊन कुठे चालावे ? आणि तिने सांगितलेला उपाय तरी कोण मला करून देणार ?त्यापेक्षा नर्मदा मातेला प्रार्थना केली की तू मला क्षमा कर आणि या म्हातारीने दिलेले औषध मी तुला समर्पित करतो त्याच्या बदल्यात तू माझ्या पायाचे दुखणे जमल्यास बरे कर ! आणि त्या छोट्याशा पुलावरून मी सर्व झाडपाला नर्मदार्पण करून टाकला ! तिथून पुढे खरोखरीच माझ्या पायांना भरपूर आराम मिळाला . सुरुवातीच्या पंधरा दिवसांमध्ये जसे पाय दुखायचे तसे पुन्हा कधीही दुखले नाहीत . मी पुन्हा नदीच्या काठावरचा शेतांच्या बांधावरील मार्ग पकडला . अशा मार्गावर मऊसर चिखल असतो . ज्याच्यामुळे पायाला चांगली पकड येते ,असा माझा यापूर्वीचा अनुभव होता .  त्यामुळे बांधांमधील मोठी फट व पलीकडे मऊ चिखल दिसताच मी मोठी ढांग मारून पलीकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला , परंतु झाले भलतेच

लेखांक ३२ : रामघाटावरची हाडे गोठवणारी थंडी

इमेज
कडाक्याच्या थंडीमुळे आणि पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे सकाळी डोळे उघडले तर मी अजूनही साष्टांग नमस्कार घातलेल्या अवस्थेतच होतो . समोरची शेकोटी पूर्णपणे विझून गेली होती . काल मी नर्मदेतून आणलेला भला मोठा ओंडका पूर्णपणे भस्मसात झाला होता .मी चटकन उठून कुटीच्या बाहेर आलो . त्या झोपड्यातून माझा दंड तेवढा सोडवून घेतला . आणि बाकीची कुटी तशाच अवस्थेत ठेवून झोळी उचलली . मागून कोणी गावकरी किंवा परिक्रमावासी आले तर त्यांना इथे कोणीतरी राहून गेले होते हे कळावे हाच हेतू .     प्रातिनिधक चित्र सकाळचे सहा वाजले असावेत . अंधुक अंधुक दिसू लागले होते . सर्वत्र घनदाट धुके पसरले होते . थंडी हाडांपर्यंत शिरत होती . मला रामघाट गाठण्यासाठी अजून किमान १२ किलोमीटर चालायचे होते . आणि अजूनही मी वनराजाच्या अर्थात वाघाच्या टप्प्यामध्येच होतो . त्यामुळे मी नर्मदा मातेला वंदन केले आणि ताबडतोब तिथून धूम ठोकली . रात्री पोटभर जेवल्यामुळे आता पायांना चांगली गती आली होती . मुख्य म्हणजे रोज सकाळी जाणवते तशी शौच विसर्जनाची गतीच पोटाला जाणवत नव्हती . इतके पोटभर जेवून देखील पोट अगदी हलके हलके वाटत होते . नर्मद सिंगन

लेखांक १४ : सकरी गावचा लम्मू लाल विश्वकर्मा

इमेज
डॉक्टर प्रल्हाद पटेल यांनी सांगितलेला पाच ते दहा किलोमीटर चालण्याचा नियम माझ्याकडून पाळला जात नाही याची थोडीशी खंत मनात होती .परंतु पायांना त्रास देखील होत नव्हता .तसेही महाराष्ट्रातील परिक्रमावासी इतर राज्यातील लोकांपेक्षा जास्त अंतर चालतात असा इथल्या स्थानिक लोकांचा अनुभव आहे .महाराष्ट्रामध्ये असलेल्या दऱ्याखोऱ्या हे त्याचे कारण असावे .या दऱ्याखोऱ्या किल्ल्यांवर भटकणाऱ्या पायांना लांब अंतर तोडण्याची सवय असते .सक्री / सकरी गावापर्यंत मी न थांबता चालत राहिलो .इथे उजव्या हाताला एक विहीर आणि खूप मोठा वृक्ष होता . तिथे छोटीशी झोपडी होती .  हे झोपडीवजा घर म्हणजेच लम्मूलाल विश्वकर्मा यांनी स्वतःच्या कष्टातून उभे केलेले परिक्रमावासींचे सेवा क्षेत्र आहे . अतिशय सुंदर छोटेखानी असा हा आश्रम आहे . संपूर्ण मातीने आणि शेणाने सरविलेला आश्रम अतिशय आरामदायक आणि सुखद असा आहे .दुपारी थंडगार वाटणारा हा परिसर रात्री तितकाच उबदार होऊन जातो ! छोटे दगडी जाते आपले लक्ष वेधून घेते . लम्मू लाल विश्वकर्मा यांचा आश्रम मला बराच काळ नर्मदा मातेचे दर्शन झालेले नव्हते