पोस्ट्स

गजानन महाराज आश्रम लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ६८ : श्री क्षेत्र ओंकारेश्वर , श्री क्षेत्र अमलेश्वर , ओंकारमांधात पर्वत

इमेज
ओंकारेश्वर . . . नर्मदा परिक्रमा हा विषय निघाला की ओघाने सर्वांच्या मुखात येणारे पहिले नाव म्हणजे ओंकारेश्वर ! काय आहे या स्थानात ?का एवढा जयजयकार ओंकारेश्वराचा ? हे खरं म्हणजे तिथे प्रत्यक्ष येऊनच अनुभवायला पाहिजे . मी ओंकारेश्वर क्षेत्राचे प्रथम दर्शन नर्मदा परिक्रमेदरम्यानच घेतले . त्यापूर्वी हा सुयोग कधी आला नव्हता . परंतु परिक्रमे नंतर मात्र पुन्हा पुन्हा ओंकारेश्वर बोलावून घेतो ! आपल्या पश्चिम महाराष्ट्रातून तुलनेने सर्वात जवळचे व गाडी लोहमार्ग सर्वचप्रकारे सोयीचे ,पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे ओंकारेश्वरच आहे .   उजव्या हाताला दिसणाऱ्या ओंकार मान्धात पर्वतावर जाणारा पादचारी पुल या ओंकारेश्वराचा महिमा अपरंपार आहे .प्रत्येक परिक्रमावासी त्याच्या परिक्रमेदरम्यान दररोज ज्या नर्मदा जलाच्या शिशीची पूजा करतो त्यातील सर्व नर्मदा जल हे परिक्रमा संपल्यावर ओंकारेश्वराच्या पिंडीवर अर्पण करावयाचे असते ! थोडक्यात काय तर ओंकारेश्वराला चढविण्यासाठी तीर्थ यात्रा करून त्या जलाची तीर्थ शुद्धी करण्याची प्रक्रिया म्हणजे नर्मदा परिक्रमा आहे . इतके या स्थानाचे महात्म्य आहे . ओंकारेश्वर या स्थ