पोस्ट्स

ज्ञानेश्वरी कुटी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ३० : नर्मदा खंडातील एक अतुलनीय संत श्री रामदास बाबा

इमेज
रामदास बाबांनी पुन्हा काही त्या साधूचा विषय काढला नाही . यावरून त्यांच्यासाठी असे चमत्कार नित्याचेच होते हे लक्षात आले ,किंवा अशा चमत्कारांना साधकाने फारसे महत्त्व देऊ नये असा त्यांचा भाव असावा . तो मी पक्का आत्मसात करण्याचा निश्चय केला . आता या रामदास महाराजांविषयी तुम्हाला थोडेसे सांगावेच लागेल . संपूर्ण परिक्रमेमध्ये मला जे कोणी सर्वाधिक तपस्वी अद्भुत आणि अलौकिक महात्मे भेटले त्यातील सर्वोच्च क्रमांक रामदास महाराजांचा असायला हरकत नाही . ( ती माझी योग्यता किंवा लायकी खचितच नाही ,परंतु भौतिक पातळीवर हा प्रश्न अनेकांनी मला विचारला आहे म्हणून सांगतो आहे की किमान मला आलेल्या अनुभूतींच्या पातळीवर मला जाणवलेली क्रमवारी अशी आहे ) परमपूज्य श्री सियाराम बाबा तर सर्वांना ज्ञात आहेतच व त्यांचे मला आलेले अनुभव पुढे ओघाने सांगेनच . परंतु त्यांचा आश्रम तुलनेने सहजगम्य आहे .रामदास बाबांना भेटण्यासाठी तुम्हाला तुमचा जीव धोक्यात घालून प्रवास केल्याशिवाय दर्शन शक्य नाही . इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असून देखील रामदास बाबांनी आपले तपोसामर्थ्य असे काही वाढविलेले आहे की त्याच्या अनुभूती तुम्हाला पदोपदी येऊ...