पोस्ट्स

मनेरी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक १३ : दत्तप्रभूंची इच्छा

इमेज
दुपारी मोकळा वेळ मिळाल्यावर मी प्रल्हाद पटेल यांच्या २२ एकर शेताला वळसा मारून , मागे असलेल्या वीटभट्टीच्या शेजारून वाहणाऱ्या एका छोट्याशा परंतु सुंदर अशा रानवे नामक नदीमध्ये कपडे धुऊन घेतले .  तिथल्याच खडकावरती पाच दहा मिनिटात कपडे वाळले सुद्धा . संध्याकाळी प्रल्हाद पटेल आले आणि माझ्या शेजारी येऊन बसले . त्यांच्याविषयी ते सांगू लागले .गेली २१ वर्षे अव्याहतपणे न चुकता , २७ किलोमीटर दूर जाऊन ग्वारी घाटावरील नर्मदा दर्शनाची वारी ते करत होते . ते मला म्हणाले , मला काय वाटले माहिती नाही .परंतु तुम्ही आज इथे मुक्काम करावा अशी दत्तप्रभूंची इच्छा आहे , असा संकेत मला झाला .म्हणून मी तुम्हाला थांबवले . नाही तर शक्यतो मी कोणालाच थांबवत नाही . भारतीय जनता पक्षाच्या कार्याविषयी ते अतिशय तळमळीने बोलत होते . या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांची नुकतीच पुण्यामध्ये काही कामा निमित्त माझी भेट झाली होती व ते त्यांच्या सोबत जावडेकरांच्या मुलाच्या पुस्तक प्रकाशनाच्या एका कार्यक्रमाला देखील मला घेऊन गेले होते .हे सांगितल्यावर तर डॉक्टर प्रल्हाद पटेल माझ्या इथून हलेचनात ! कारण हे राष्ट्रीय उप...