पोस्ट्स

शूलपाणी झाडी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक १२८ : कडीपानी ची कडी परीक्षा व जलमग्न कलहंसेश्वर अर्थात हाफेश्वर

इमेज
वाजेपूरची बावडी सोडली आणि पुढे तलाव लिंबडी रायसिंगपुरा बुंजर चिखली अशी गावे पार करत कडीपानी या ठिकाणी आलो . हे सर्व आदिवासी क्षेत्र आहे . डोंगराळ प्रदेश ,कठीण माणसं ! मध्ये रायसिंगपुरा या गावामध्ये एक मूर्तिकार भेटला . त्याचे नाव होते नागिनभाई कोदरभाई सिलावट . याने मला चहा पिण्यासाठी घरी बोलावले . चक्क मराठी भाषेमध्ये बोलत होता ! नंतर कळाले की याच्या सौभाग्यवती नंदुरबार जिल्ह्यातल्या असल्यामुळे याला मराठी येत होते . मूर्ती बनवण्यासाठी हा महाराष्ट्र मध्ये फिरलेला होता . तसा हा पूर्वीचा महाराष्ट्राचाच भाग ! नवीन राज्य रचनेमुळे मध्य प्रदेश आणि गुजरातला मिळालेला . पूर्वी गुजरातचा विस्तार मुंबईपर्यंत होता . आता सुद्धा कानबेडा या गावातून मी एक गंमत पाहिली होती आणि तिची नोंद डायरीमध्ये केलेली आहे ! या गावावरून दर पाच मिनिटाला एक विमान उडत होते . साधारण उडाण्याची दिशा पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की हा बहुतेक मुंबई ते कर्णावती (अहमदाबाद ) हवाई मार्ग आहे . अशा अनेक गमतीशीर गोष्टी परिक्रमेमध्ये दिसायच्या . लिहून ठेवल्या तेवढ्या लक्षात राहतात . बाकीच्या हळूहळू विस्मरणात जातात . रायसिंग पुरा ग...