पोस्ट्स

एकादशी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक २१ : एकादशी आयुष्याची

इमेज
साधू ने बघता बघता नदीच्या काठचा रस्ता पकडला . काठावरून म्हणजे किती काठावरून चालावे त्याने ?उजव्या हातातील काठी सतत नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडत होती इतक्या काठाने आम्ही चालत होतो . डावीकडे प्रचंड माजलेले गवत आणि झाडी होती .उजव्या हाताला खळखळून वाहणारी नर्मदा माई होती . कुठून कोणास ठाऊक परंतु एक पाऊल ठेवण्या इतका मार्ग सगळीकडे निर्माण झालेला होता . साधूने मला काठाने कसे चालायचे ते शिकवले . मला खात्री आहे की जर मी एकटा त्या मार्गावर गेलो असतो तर रस्ता नाही असे समजून परत उलटा फिरलो असतो .परंतु त्याने मला समोर रस्ता आहे का नाही हे कसे ओळखायचे ते शिकवून ठेवले . काठावरती उभे राहिल्यावर दोन चार किलोमीटर पुढील नदीची वळणे दिसतात तिथला मार्ग देखील इथूनच ताडून ठेवता येतो ती कला देखील त्याने शिकविली . वाटेत येणाऱ्या नद्या आणि नाले कसे ओलांडायचे ते देखील त्यांनी शिकविले . समोर दूरवर एखादा संगम असेल तर तो देखील अलीकडूनच कळतो, तो कसा ओळखायचा ते देखील त्याने शिकविले .नर्मदे पासून चालत चालत लांब गेल्यावर नर्मदा माता नक्की कुठल्या दिशेला आहे हे ओळखण्याची एक खतरनाक युक्ती त्याने मला शिकविली . कुठल्याही पा