लेखांक १६ : प्रभूजी का भंडार
भिकमपुर या नावाची अजून काही गावे नर्मदे काठी आहेत .हे तुलनेने छोटेसे गाव आहे .मी गावामध्ये प्रवेश करणार इतक्यात दूरवरून एका शाळेतील मास्तर मला बोलवत आहेत असे मला लक्षात आले .मी शाळेमध्ये पोहोचलो .मास्तरांनी विचारले , " नर्मदे हर महाराज ! आप कहा बिराजेंगे ? छाया मे या धूप मे ? " आपली योग्यता नसली तरी देखील इथे सर्व लोक आपल्याला महाराज , बाबाजी , स्वामीजी ,पंडित जी ,दादाजी ,अशा विविध नावांनी हाक मारतात . ऐन माध्यान्ही ची वेळ झाली होती तरी देखील थंडीमुळे ऊन बरे वाटत होते .मी उन्हातच खुर्ची लावण्याचा इशारा केला . मला हे माहिती नव्हते परंतु परिक्रमावासी परिक्रमेदरम्यान खुर्ची मध्ये सुद्धा बसत नाहीत . शक्यतो जमिनीवरच बसतात .परंतु तिथे अजून चार-पाच शिक्षक होते . त्यामुळे त्यांना संकोच वाटू नये म्हणून मी त्यांचे सोबत खुर्ची मध्ये बसलो .बसणे असा साधा शब्द न वापरता बिराजना असे जड शब्द सर्रास वापरले जातात . बसल्या बसल्या शाळेतील मुलांनी बर्फासारखे थंडगार प्यायला पाणी आणून दिले व चहा आणण्यासाठी निघून गेली . तोपर्यंत शिक्षकांशी एकंदरीत शिक्षण पद्धती विषयी चर्चा करू लागलो .लॉकडाऊन मुळे सर्