पोस्ट्स

गीता धाम लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !

इमेज
सगळे आटोपून निघेपर्यंत वेळ झाली होती ११ : ११ !  सूर्य चांगलाच तळपत होता , त्यामुळे थंडी जाणवत नव्हती .नर्मदेच्या काठाकाठाने चालत चालत निघालो . माझ्या असे लक्षात आले की वाटेत लोकच तुम्हाला रस्ता सांगतात .लोक सांगू लागले ,बाबाजी यहा से जाओ । बाबाजी वहा से जाओ । त्याप्रमाणे पुढे चालत राहिलो . वाटेमध्ये एक आयुर्वेदिक महाविद्यालय लागले . मला कोणीतरी असे सांगितले होते की मध्येच पोलीस तुम्ही करोना लस घेतली आहे का नाही याची तपासणी करतात व लस घेतली नसेल तर घरी पाठवतात . मी एक डोस कागदोपत्री घेतला होता . त्यामुळे दुसरा डोस मिळतो का ते पाहण्याकरता आयुर्वेदिक कॉलेजमध्ये चौकशी केली .  तिथले मुख्य डॉक्टर भेटले . त्यांनी सांगितले , तुम्ही कुठलीही चिंता करू नका . ही नर्मदा माता आहे .हिच्या काठावरती अन्य कोणाचेही नियम चालत नाहीत . मैय्या के किनारे करोना फिरोना कुछ नही चलता ! त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे चालत रहा . संपूर्ण कोरोना काळामध्ये देखील नर्मदा परिक्रमा व्यवस्थित चालू होती आणि एकाही परिक्रमा वासीला करोना झालेला नाही हे त्यांनी मला आवर्जून सांगितले .एका डॉक्टरचा देखील नर्मदा मातेवर कित