पोस्ट्स

बरमान घाट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ४८ : सतधारा , सूर्यकुंड आणि परमपवित्र बर्मान घाट

इमेज
 शेर संगम घाटाचे नाव ग्वारी घाट असेच आहे . या ग्वारी घाटावर नर्मदा मातेला खूप मोठी साडी नेसवली होती . या काठावरून त्या काठावर मोठी केबल ताणून बांधलेली असते .त्यावर अग्निबाण लावून साडी सोडली जाते . पूर्वी धनुष्यबाणाने साडी सोडली जायची . रेवा नावाच्या गुजराती चित्रपटामध्ये माहेश्वर घाटावर चित्रित झालेले नर्मदेला साडी नेसवण्याचे अलौकिक दृश्य  काही ठिकाणी नावेने देखील साडी पलीकडे नेली जाते . या साडी नेसविण्याच्या विधीची छायाचित्रं वाचकांसाठी सोबत जोडत आहे .हा विधी खरोखरच बघण्यासारखा असतो . माझ्या आधी तिथून काही परिक्रमा वासी गेले होते त्यांनी हे फोटो काढले होते . आत्ता त्यांच्याकडून मला ते प्राप्त झाले .   शेर संगम  घाटावर नर्मदा मातेच्या जयंती चा सुरू असलेला उत्सव . मी साधूला याच माळा काढण्यासाठी मदत केली होती .  नर्मदा मातेला नेसविण्यात येणारी लांबच लांब साडी पुढे पुढे पात्राची रुंदी जशी वाढत जाईल तसतशा साड्या देखील मोठ्या होत जातात . परंतु प्रत्यक्ष साडी नेसवलीच जाते . ...