पोस्ट्स

अमगवा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक १६ : प्रभूजी का भंडार

इमेज
भिकमपुर या नावाची अजून काही गावे नर्मदे काठी आहेत .हे तुलनेने छोटेसे गाव आहे .मी गावामध्ये प्रवेश करणार इतक्यात दूरवरून एका शाळेतील मास्तर मला बोलवत आहेत असे मला लक्षात आले .मी शाळेमध्ये पोहोचलो .मास्तरांनी विचारले , " नर्मदे हर महाराज ! आप कहा बिराजेंगे ? छाया मे या धूप मे ? " आपली योग्यता नसली तरी देखील इथे सर्व लोक आपल्याला महाराज , बाबाजी , स्वामीजी ,पंडित जी ,दादाजी ,अशा विविध नावांनी हाक मारतात . ऐन माध्यान्ही ची वेळ झाली होती तरी देखील थंडीमुळे ऊन बरे वाटत होते .मी उन्हातच खुर्ची लावण्याचा इशारा केला . मला हे माहिती नव्हते परंतु परिक्रमावासी परिक्रमेदरम्यान खुर्ची मध्ये सुद्धा बसत नाहीत . शक्यतो जमिनीवरच बसतात .परंतु तिथे अजून चार-पाच शिक्षक होते . त्यामुळे त्यांना संकोच वाटू नये म्हणून मी त्यांचे सोबत खुर्ची मध्ये बसलो .बसणे असा साधा शब्द न वापरता बिराजना असे जड शब्द सर्रास वापरले जातात . बसल्या बसल्या शाळेतील मुलांनी बर्फासारखे थंडगार प्यायला पाणी आणून दिले व चहा आणण्यासाठी निघून गेली . तोपर्यंत शिक्षकांशी एकंदरीत शिक्षण पद्धती विषयी चर्चा करू लागलो .लॉकडाऊन मुळे सर्...