पोस्ट्स

आदिवासी मुले लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ९३ : वाल्मिकी आश्रम बोरिया इथले अश्वत्थाम्याने स्थापन केलेले श्री माखणेश्वर शिवलिंग

इमेज
दुपारी निघाल्यावर नर्मदा मातेच्या किनाऱ्याने जावे असा विचार करत असतानाच एका साधूने सांगितले की इथून केवळ पाच किलोमीटर अंतरावर अश्वत्थाम्याची तपोभूमी आहे . तिचे दर्शन अवश्य करावे . बोरिया नावाचे हे गाव आहे . इथे अश्वत्थामा स्वतः राहिलेला असून त्याने स्वतःच्या हाताने माखनेश्वर नावाचे शिवलिंग स्थापन केलेले आहे . इथून नर्मदा मातेचा तट केवळ तीन किलोमीटर आहे . आल्यासरशी या स्थानाचे दर्शन करावे असा विचार केला , आणि बोरिया बिस्तर उचलून डांबरी सडकेने चालत बोरिया गाव गाठले . गावामध्ये शेती आणि झाडी चांगली होती . अश्वत्थाम्याच्या कठोर तपामुळे महादेव त्याला इथे प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याच्या कपाळाला माखन लावले अर्थात लोणी लावले म्हणून या महादेवाचे नाव माखनेश्वर / माखणेश्वर किंवा नवनीतेश्वर असे पडले . (गुजराती मध्ये माखणेश्वर असे म्हणतात ) . त्यामुळे इथे असलेल्या शिवलिंगाला पाण्यासोबतच लोण्याने देखील लेप केला जातो . इथल्या शिवलिंगाचे वैशिष्ट्य असे आहे की याचा आकार दरवर्षी थोडा थोडा वाढत आहे . पूर्वी अतिशय छोटे असलेले हे शिवलिंग आता जलहरीच्या देखील बाहेर आलेले आहे . गणपतीपुळे मूळ गाव असलेले बडोद्