पोस्ट्स

मकरसंक्रांती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक २३ :अविस्मरणीय संक्रांति

इमेज
खाटी गावापासून तीन प्रकारचे मार्ग अमरकंटकच्या दिशेला निघतात . एक पक्का डांबरी सडक मार्ग आहे .या मार्गावरून सुमारे ९० टक्के परिक्रमावासी पुढे जातात . एक साधा पायवाटेचा मार्ग आहे ज्या मार्गे नऊ टक्के लोक जातात .आणि चंचल अवखळ छोट्याशा कन्ये प्रमाणे भासणाऱ्या रेवा राणीच्या काठाने जाणारा एक अति खडतर मार्ग आहे जो केवळ एक टक्का लोकच स्वीकारतात . माझी या अखेरच्या मार्गाने जाण्याची इच्छा होती .आणि नर्मदा मैयाने माझी या टप्प्यामध्ये चांगलीच खडतर परीक्षा देखील पाहिली . इथे लोक नर्मदेच्या काठाने चालत नाहीत यात त्यांचा खरोखरीच दोष नाही कारण या संपूर्ण पठारावर अनेक छोटे ओढे नाले उगम पावतात आणि नर्मदेला येऊन मिळतात . परंतु मुळात नर्मदा माईच इथे इतकी छोटी आहे की तुम्हाला तुमच्या समोर आलेली नदी ही नर्मदाच आहे हे लक्षात देखील येत नाही . आणि सहज एका उडीमध्ये तुम्ही ती ओलांडून जाता आणि तुमची परिक्रमा खंडित होते . असे खूप परिक्रमावस्यांच्या बाबतीत अनेक वेळा झालेले आहे . त्यामुळे इथे स्थानिक लोक देखील तुम्हाला रस्त्याने जाण्याचा सल्ला देतात . परंतु या बाबतीत मी एक फार सोपे सूत्र लक्षात ठेवले होते . नर्मदा न