पोस्ट्स

काला पहाड लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ३९ : अखंड रामायण सेवा चाललेली मधुपुरीची मार्कंडेय तपोभूमी घोडाघाट

इमेज
वाघाने मारलेल्या म्हशी बद्दल विचार करत पुढे चालत राहिलो . एवढ्या ताकदवान जनावराला लोळवून ठार करणारा वाघ किती शक्तिमान असेल याची कल्पनाच न केलेली बरी . आणि मुळात अशा वाघाच्या तावडीत मनुष्य प्राणी सापडला तर तो त्याचे किती हाल करू शकतो केवळ या विचाराने देखील अंगावर काटा आला ! मध्ये डाव्या हाताला एक डोंगर अखंड सोबत चालतो आहे असा भास होत होता . हा संपूर्ण डोंगर काळ्या रंगाच्या खडकांनी भरलेला होता .  पुढे गेल्यावर त्याच्या नावाची पाटी दिसू लागली . या डोंगराला काला पहाड असे म्हटले जाते . हे पर्यटकांचे खास आकर्षण असून या पहाडावरती अतिशय मोठ्या मोठ्या काळ्या रंगाच्या भव्य कातळ शिळांचा अक्षरशः खच पडलेला आढळून येतो . इथल्या राणीशी जोडलेल्या काही कथा देखील लोक या पहाडा विषयी बोलताना सांगतात . अतिशय वैचित्र्यपूर्ण असलेल्या या शिळा महाराणीच्या इशाऱ्यावर जागा सोडून हलत असत असे स्थानिक लोक मानतात.  काला पहाड वरील भव्य शिळांचा खच (संग्रहित छायाचित्रे ) अशा प्रकारच्या शिळा भारतानंतर केवळ उत्तर आयर्लंड मध्ये आढळतात आणि या करोडो वर्ष जुन्या आहेत अशी...