पोस्ट्स

परस्ते लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ३१ : जंगलात मुक्काम आणि अपरात्री आलेला अनुभव

इमेज
परस्तेने सांगितल्याप्रमाणे मी कुठे मोकळे आकाश दिसते आहे का ते शोधत चालू लागलो . परंतु ते अरण्य इतके घनदाट होते की आकाश दिसतच नव्हते . एव्हाना अंधार पडायला सुरुवात झालेली होती . अरण्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती . अखेरीस मला एक जागा सापडली जिथे मुक्काम करावा अशी आतून प्रेरणा झाली .  अमरकंटकच्या जंगलातील नर्मदा मातेचे संग्रहित चित्र आत्ता गुगल मॅप वर मी ती जागा शोधून काढली आहे , ती साधारण अशी होती . चित्रात अंधारी रेषा दिसत आहे ते नर्मदेचे पाच दहा फुटाचे पात्र आहे . ह्या घोर जंगलातून शक्यतो जाऊ नका असे नर्मदा परिक्रमा विषयक पुस्तके देखील आवर्जून सांगतात . इथे फार काही मोकळी जागा नव्हती परंतु थोडीशी सपाटी जाणवली . या भागातील झाडी इतकी दाट आहे की तुम्हाला खरोखरच आकाश दिसत नाही .डिस्कवरी चैनल वर येणाऱ्या मॅन वर्सेस वाइल्ड मध्ये बेअर ग्रील्स हा माजी इंग्लिश सैनिक जसे जंगलात मुक्काम करतो तसे काहीतरी मला करायचे होते . आता मला एखादी तात्पुरती कुटी उभी करायची होती .माझ्याकडे एक दंड होता . तेच माझे एकमेव हत्यार होते . जास्ती आवाज करून देखील चालणार नव

लेखांक २९ : दूधधारे पाशी भेटलेला अलौकिक साधू

इमेज
आजची चाल मोठी आव्हानात्मक होती .गीता स्वाध्याय मंदिरातून निघेपर्यंत अर्धा दिवस उलटून गेला होता. आणि पुढे जंगलची वाट सुरू होणार असल्यामुळे पायांना प्रचंड गती देणे अतिशय आवश्यक होते . कारण अंधार पडायच्या आत मला रामदास बाबांची ज्ञानेश्वरी कुटी गाठायची होती . परंतु अमरकंटक मधून वाहणारी नर्मदा माता इतकी सुंदर आहे की तिचे रूप पाहताच बसावे असे वाटते ! नर्मदा कुंडातून बाहेर पडल्या पडल्या नर्मदा माता पुन्हा थोडीशी लहान होते आणि थोड्याच अंतरावर घातलेल्या एका मोठ्या बंधाऱ्यामुळे एक विशाल स्वरूप धारण करते . असे छोटे मोठे अनेक बांध अमरकंटक च्या हद्दीमध्ये आहेत . इथे चांगले पक्के घाट बांधलेले असून त्या घाटावरती भाविकांची आणि स्थानिक लोकांची बऱ्यापैकी वर्दळ असते . उगमाचेच स्थान असल्यामुळे पाणी इतके स्वच्छ सुंदर आणि नितळ आहे की विचारू नका ! ज्याप्रमाणे एक दोन वर्षांची बाळे ही अतिशय तेजस्वी सुंदर आणि गोड दिसतात तशी ही नुकतीच जन्माला आलेली नर्मदा राणी दिसत होती ! तिचे ते रूप डावलून पुढे जाणारा कमनशिबीच म्हटला पाहिजे ! त्यामुळे मी अगदी किनारा पकडून काठाकाठाने चालू लागलो . या भागात नर्मदा टप्प्याटप्प्याने