लेखांक १७ : कोल्ह्याने शिकविलेला धडा
गेले तीन दिवस मी सरासरी १८ ते २२ किलोमीटर चालत होतो .डॉक्टर प्रल्हाद पटेल म्हणाले त्याप्रमाणे हळूहळू माझे पाय बोलू लागले . सुरुवातीचे काही दिवस केवळ पाच ते दहा किलोमीटर चालण्याचा सल्ला मी मनावर घेतलेला नव्हता . त्यामुळे दुसऱ्या दिवशी पहाटे निघालो खरा परंतु माझे पाय खूपच दुखू लागले .पाय दुखू लागले की मी थोडासा एका कडेला उभा राहून थांबायचो आणि थंडी भरून आली की पुन्हा चालायला लागायचो . असा थांबत थांबत मी निघालो होतो . माझ्या मागचे सर्व परिक्रमावासी झपाझप पुढे निघून गेले . ते कसे काय इतक्या गतीने चालत आहेत हेच मला कळत नव्हते . आपल्याकडून काही परिक्रमा पूर्ण होणार नाही असे वाटू लागले . एक क्षणभर असाही विचार मनात आला की आता आपण नर्मदेचे दर्शन घेतलेले आहे . नर्मदेच्या काठी चार पावले चाललो सुद्धा आहे तरी चला घरी परत जाऊया ! अशा सर्व नकारात्मक विचारांनी मनामध्ये गर्दी केलेली असताना अचानक उजवीकडून धावतच एक सुंदर असा कोल्हा माझ्यासमोर आला .आणि माझ्याबरोबर समोर येऊन दचकून थांबला . याची पूर्ण वाढ झालेली नव्हती हे कदाचित कोल्ह्याचे पिल्लू असावे व ती मादी असावी .अतिशय सुंदर असा तो कोल्हा