पोस्ट्स

ग्यारहलिंगी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ७६ : खलघाट आणि कठोऱ्याचा ग्यारहलिंगी आश्रम

इमेज
तो कानफाट्या गोसावी , काटे-कुटे ,चिखल , दगड कशाचीही तमा न करता चालत गेल्याचे दिसत होते . त्याचे उठलेले प्रत्येक पाऊल माझ्यासाठी प्रेरणादायी होते . त्याच्या ढांगा खूप मोठ्या होत्या .योग्य वयात वैराग्याची आग आत मध्ये लागलेली व्यक्ती कशी असू शकते हे मी त्याच्या रूपाने अनुभवत होतो . तो पुन्हा काही दिसला नाही . वाचकांना कानफाट्या गोसावी म्हणजे काय हे माहिती नसेल तर कळावे म्हणून एका प्रतिनिधिक गोसाव्याचे चित्र टाकलेले आहे . हे नाथपंथीय साधू  लोक कानामध्ये छिद्र करून मोठी लाकडी किंवा धातूची कडी कानात घालतात . योगी आदित्यनाथ देखील त्या अर्थाने कानफाटे गोसावी आहेत . हा मराठी भाषेतील प्रचलित शब्द आहे .  काठावरचा रस्ता कठीण होता परंतु अगम्य नक्कीच नव्हता . प्रत्येक पावलाला नर्मदा मैया तिची सुंदर सुंदर रुपे दाखवत होती ! इथून पुढे खलघाट लागणार होता . महाराष्ट्रापासून इंदोरला जाणारा महामार्ग खलघाट वरूनच नर्मदा ओलांडतो . सियाराम बाबांच्या आश्रमात भेटलेले माऊली शिंदे त्यांच्या शिष्यां सोबत इथूनच नाशिकला चालत जाणार होते .    इथे देखील मध्ये अनेक नद्यानाले नर्म...