पुनर्वनीकरण @ शूलपाणी झाडी
॥ नर्मदे हर ॥
नर्मदा परिक्रमेतील अतिशय महत्त्वाचा टप्पा असलेल्या शूलपाणीच्या झाडीमध्ये आज-काल नावाला देखील झाडे शिल्लक नाहीत . कारणे काहीही असोत .परंतु निर्वनीकरण झाले आहे एवढे निश्चित आहे . यावर उपाय एकच आहे .
पुनर्वनीकरण !
त्यासाठी आपण खालील प्रकल्प स्थानिक आदिवासी बांधवांच्या मदतीने तिथे राबवत आहोत .
१) बीज गोळे निर्मिती व प्रक्षेपण
२) प्रत्यक्ष वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन
३) वृक्षारोपणासाठी आवश्यक सुविधा निर्मिती
४) श्री रघुनाथ ढोले गुरुजी (देवराई संस्था पुणे ) यांच्या मदतीने देवराई , घनवन व फलोद्यान निर्मिती
पुणे येथील परिक्रमा वासी श्री महेश माधव कुलकर्णी व सौ नेहा महेश कुलकर्णी यांनी गोळा केलेल्या देशी बिया नुकत्याच खप्परमाळ येथे पाठवण्यात आल्या . तेथील परिक्रमावासींची सेवा करणारे नर्मदा भक्त श्री दिनेश फोदला पावरा यांनी हा संपूर्ण उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे . त्यांनी कुटुंबीयांच्या मदतीने या बिया मोकळ्या करून त्याचे सुमारे पंधराशे बीज गोळे बनवलेले आहेत . लवकरच पाऊस सुरू झाल्यावर त्यांचे प्रक्षेपण सुरू होईल .
महाराष्ट्राचे वनखाते या कामांमध्ये आपल्याला संपूर्ण सहकार्य करत आहे . त्याबद्दल वनक्षेत्रपाल श्री महेश चव्हाण जी यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार !
वृक्षारोपणासाठी आवश्यक असलेल्या संरक्षक जाळ्यांची निर्मिती आणि खड्डे काढून घेणे ही कामे सध्या सुरू आहेत .
त्यासाठी लागणारी अवजारे अर्थात कुदळ अधिक फावडे यांचे तीन संच वाचकांच्या सहकार्यातून विकत घेण्यात आलेले आहेत . जितके अधिक संच निर्माण होतील तितके खड्डे काढणे वेगवान होईल . प्रत्येक खड्डा काढण्यासाठी काही श्रम मूल्यदान आपण आदिवासी बांधवांना देणार आहोत . तसेच प्रत्येक जाळीसाठी देखील आर्थिक मदत करणार आहोत . अशी आर्थिक मदत मिळाल्यामुळे अधिकाधिक झाडे लावण्यासाठी आदिवासी बांधव प्रवृत्त होतील याचा विश्वास वाटतो . आपल्याला इथे दोन हजार लिटर पाण्याचे एक टाकी बसवावी लागणार आहे . आणि तीन अश्वशक्तीची सोलर मोटर बसवावी लागणार आहे . ठिबक सिंचन करता आले तर उत्तम होणार आहे . या सर्वांसाठी निधीची गरज आहे . या संपूर्ण प्रकल्पाचे कार्य प्रकल्प समन्वयक म्हणून दादर येथील नर्मदा भक्त वृक्षमित्र सीमाताई खोत पाहत आहेत . आपण या कामासाठी त्यांना थेट संपर्क करू शकता . तसेच आपल्याकडे देशी वृक्षांच्या बिया असतील तर त्या देखील आम्ही गोळा करतो आहोत . त्यासाठी देखील आपण त्यांना किंवा खालील ई-मेल आयडीवर संपर्क करू शकता .
संपर्क : सीमाताई खोत दादर 80807 04104
ई-मेल : mazinarmadaparikrama@gmail.com
श्री महेश माधव कुलकर्णी पुणे 98812 32205
कुठलीही रक्कम आम्ही स्वतः स्वीकारत नसून थेट दिनेश पावरा यांच्या अकाउंटला आपण ट्रान्सफर करू शकता . जेणेकरून त्यांना स्थानिक भागात खरेदी करणे शक्य होते .
दिनेश पावरा यांना मदत पाठविल्यावर त्याचा स्क्रीनशॉट सीमा ताईंना पाठवावा व ईमेल आयडी वरही टाकावा ही विनंती .
दिनेश पावरा यांचा जी पे क्रमांक खालील प्रमाणे आहे :
दिनेश फोदला पावरा 74477 21491
आतापर्यंत या प्रकल्पासाठी कोणी कोणी किती किती दान केले आहे ते आपल्याला ब्लॉग वरील दात्यांची यादी उघडल्यावर हिरव्या रंगात रंगवलेले दिसेल .
या कामाची काही क्षणचित्रे आपल्यासाठी खाली देत आहे ती पाहावीत . सर्वात शेवटी आपण गोळा करून शूल पाणीच्या झाडीमध्ये पाठविलेल्या विविध प्रकारच्या बियाण्यांची यादी दिलेली आहे . ती देखील पहावी . आणि आपल्या जवळच्या कुठल्याही देशी बीया आवर्जून आम्हाला आणून द्याव्यात .
ता क : १५ /६ / २०२४ रोजी परिक्रमावासी श्री जयंतराव पाठक उपळाईकर बार्शी यांनी त्यांच्या शेतातील उत्कृष्ट दर्जाची ज्वारी फोदला मामाच्या शेतात पेरणी करता प्रस्तुत लेखकासोबत दिलेली आहे .
सीमाताई खोत यांनी भरपूर बिया सोबत दिलेल्या आहेत . तसेच स्वतःच्या हाताने दिनेशच्या मुलांसाठी शिवलेले सुंदर कपडे देखील दिलेले आहेत .
मीनाताई अवचट यांनी बिया ,पुस्तके आणि खेळणी सोबत दिली आहेत .
सुप्रिया कुलकर्णी यांनी गॅल्वनाईज्ड पत्र्याची एँटिक सुंदर ट्रंक दिलेली आहे .
आलोक लागू यांनी विविध प्रकारच्या देशी बिया सोबत दिल्या आहेत .
महेश राव कुलकर्णी यांनी पोते भरून बिया सोबत दिल्या आहेत .
सौ हेमा चन्ने यांनी काही बिया सोबत दिल्या आहेत
असा सर्व सुमारे ८० किलो ऐवज घेऊन प्रस्तुत लेखक भाबरीला निघालेले आहेत !
१६ । ६ । २०२४ श्रीक्षेत्र टाकरखेडा धुळे येथे बाल सेनेच्या मदतीने अर्धा क्विंटल कडुलिंबाच्या बिया गोळा केल्या .
१७ ।६ ।२०२४ म्हसावद येथे दोन हजार लिटरची टाकी खरेदी केली आणि भाबरी ला निघालो
मागे किती झाडे दिसतात मोजून पहा !
चार दिवसांच्या चालीमध्ये एकही छायादार वृक्ष मिळत नाही हे किती दुर्दैवाचे आहे !
![]() |
चारोळ्या
काजू
स्तुत्य उपक्रम
उत्तर द्याहटवाधन्यवाद ! नर्मदे हर !
हटवानर्मदे हर बाबाजी 🙏
उत्तर द्याहटवाबहोत बढीया काम 👍
हम भी अपनी ओर से यथासमय यथाशक्ती जो कुछ सेवा बन पडेगी वो भेज दिया करेंगे....जैसे माई कि इच्छा बन पडे वो कार्य करवा लेंगी 🙏
आपके कार्य को और आपके सहकर्मीयो के सहजता तथा इच्छाशक्ती को नमन 🙏
मैया शक्ती दे 🙏
जय हो माईकी 🙏