पोस्ट्स

रिछाई लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ११ : पहिला मुक्काम

इमेज
पहिलेच भोजन घेऊन तनमन तृप्त झाले ,तिथेच मुक्काम करा असा आग्रह घरातील लोक करत होते परंतु मी मनोमन असे ठरविले होते की या परिक्रमे दरम्यान आपल्या देहाचे कमीत कमी चोचले पुरवायचे , तसेही मी सात आठ किलोमीटरच चाललो होतो सकाळपासून. अजून चालता येईल असे वाटले आणि मी भर उन्हामध्ये सामान उचलले . पुढे बरेला नावाचे गाव लागले . तिथे जमुना पटेल नावाचा एकाच डोळ्याने डोळस असलेला एक चहावाला भेटला . हा गावामध्ये संघाची शाखा लावत असे . त्याच्या आग्रहाखातर सुंदर असा चहा पिऊन पुढे चालू लागलो   जमुना पटेलने एक सेल्फी काढला व मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . तो क्षण परिक्रमेच्या अगदी सुरुवातीला प्रस्तुत लेखकाचा स्वच्छ आणि वजनदार अवतार . सौजन्य जमुना पटेल . माझे कपडे नवे कोरे होते आणि क्षौर केलेले होते त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना कळत होते की हा नवीन परिक्रमा वाशी आहे .लोक कुतूहलाने थांबवत , नर्मदे हर चा पुकारा देत आणि चौकशी करत . कहा से हो बाबाजी ? क्या करते हो ? क्यू उठाई परिक्रमा ? वगैरे वगैरे .नर्मदा खंडातील लोकांनी गेल्या अनेक वर्षात इतके परिक्रमावासी पाहि