पोस्ट्स

सकरी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक १४ : सकरी गावचा लम्मू लाल विश्वकर्मा

इमेज
डॉक्टर प्रल्हाद पटेल यांनी सांगितलेला पाच ते दहा किलोमीटर चालण्याचा नियम माझ्याकडून पाळला जात नाही याची थोडीशी खंत मनात होती .परंतु पायांना त्रास देखील होत नव्हता .तसेही महाराष्ट्रातील परिक्रमावासी इतर राज्यातील लोकांपेक्षा जास्त अंतर चालतात असा इथल्या स्थानिक लोकांचा अनुभव आहे .महाराष्ट्रामध्ये असलेल्या दऱ्याखोऱ्या हे त्याचे कारण असावे .या दऱ्याखोऱ्या किल्ल्यांवर भटकणाऱ्या पायांना लांब अंतर तोडण्याची सवय असते .सक्री / सकरी गावापर्यंत मी न थांबता चालत राहिलो .इथे उजव्या हाताला एक विहीर आणि खूप मोठा वृक्ष होता . तिथे छोटीशी झोपडी होती .  हे झोपडीवजा घर म्हणजेच लम्मूलाल विश्वकर्मा यांनी स्वतःच्या कष्टातून उभे केलेले परिक्रमावासींचे सेवा क्षेत्र आहे . अतिशय सुंदर छोटेखानी असा हा आश्रम आहे . संपूर्ण मातीने आणि शेणाने सरविलेला आश्रम अतिशय आरामदायक आणि सुखद असा आहे .दुपारी थंडगार वाटणारा हा परिसर रात्री तितकाच उबदार होऊन जातो ! छोटे दगडी जाते आपले लक्ष वेधून घेते . लम्मू लाल विश्वकर्मा यांचा आश्रम मला बराच काळ नर्मदा मातेचे दर्शन झालेले नव्...