पोस्ट्स

गीता स्वाध्याय मंदिर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक २८ : अमरकंटकचे गीता स्वाध्याय मंदिर

इमेज
सोनमूढा सोडल्यावर वाटेत एकाने सांगितले की पुढे पुष्कर बंधाऱ्या पाशी यशोधन नावाचे पुण्याचे कोणीतरी अन्नछत्र चालवितात तिथे जावे . चालता चालता हळूहळू अमरकंटक गाव दिसू लागले . लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नव्हतीच . पुष्कर बंधाऱ्यावरील या आश्रमाची कोणाला माहिती आहे का हे विचारण्याकरता मी जागा शोधत होतो . एका छोट्याशा आश्रमाचे लोखंडी दार मला दिसले .दारावरती श्री गीता स्वाध्याय मंदिर अशी अक्षरे लोखंडामध्येच घडवलेली होती .  तिथून आत उन्हामध्ये खुर्ची टाकून एक वयस्कर संन्यासी बसल्याचे माझ्या लक्षात आले . त्यांची समाधी अवस्था लागलेली दिसत होती . मी बराच वेळ त्या लोखंडी दाराच्या बाहेर हात जोडून उभा राहिलो . संन्यासी महाराजांची मूर्ती अतिशय छोटीशी होती . त्या वामनमूर्तीचे वजन जेमतेम ३० ते ३५ किलोच असावे ! नुकतेच क्षौर केलेले होते . इतक्यात आतून कुणीतरी सेवेकरी आला आणि त्याने मला विचारले क्या चाहिये बाबा जी? सेवेकऱ्याच्या त्या आवाजामुळे संन्यासी महाराजांची समाधी भंग पावली .आणि माझ्याकडे पाहत त्यांनी अतिशय दमदार भरदार आणि खर्जातल्या आवाजात विचारले , " नर...