पोस्ट्स

लालपूर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक २० : नर्मदेने खास पाठविलेला साधू

इमेज
तीन दिवस पडलेल्या पावसामुळे सर्वत्र तुफान चिखल झालेला होता . नर्मदे काठची काळीभोर चिकण माती अतिशय चिकट झाली होती .प्रत्येक पावलाला पाय रुतत होते , बूट पायातून सारखे निघत होते . मग मी सरळ बूट काढून हातात धरले आणि अनवाणी चालू लागलो . मागून एक बुढ्ढा बाबा डोक्यावरती भली मोठी पिशवी घेऊन येताना दिसला . हा बाबा कटनी चा होता .त्याचे वय पाहता मला असे वाटले की हा चिखलात घसरून पडेल वगैरे . तरी याला चालायला थोडीशी मदत करावी .असा विचार करून मी माझी चाल हळू केली परंतु हा बाबा माझ्यापेक्षा वेगवान चालणारा निघाला त्याने क्षणात मला ओलांडून पुढचा मार्ग धरला आणि इतक्या वेगाने चालू लागला की त्याला गाठता गाठता माझीच तारांबळ उडायला लागली . शेतकरी लोकांना चिखलातून पार जाण्याचा उत्तम अंदाज असतो .जीवनातील कुठल्याही संकटावर मात करण्याची जिद्द आणि महत्त्वांच्या शेतकऱ्याच्या ठायी उपजत असते . थंडी भरपूर होती आणि शेतामध्ये असलेली विविध पिके पायाला गुदगुल्या करत होती . पिकावर साठलेले दवबिंदू थंडगार पडले होते आणि चालता चालता माझी छाटी संपूर्णपणे भिजवून टाकत होते . तो थंडगार स्पर्श चालून गरम झालेल्या पायांना खूप आराम ...