पोस्ट्स

च्यवन ऋषी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक १४७ : कश्यप ऋषी आश्रम व च्यवन ऋषी आश्रमादरम्यान आलेला पट्टेरी वाघाचा थरारक अनुभव

इमेज
च्यवन ऋषींचा आश्रम सोडला आणि घनघोर अरण्य सुरू झाले . या अरण्यातून जाणारी एक छोटीशी पायवाट होती . म्हणजे तशी एखादी जीप गाडी जाऊ शकेल असा कच्चा मातीचा रस्ता होता परंतु पालापाचोळा पडल्यामुळे आणि गवत उगवल्यामुळे रस्ता जणूकाही लपलेला होता . आजूबाजूचे जंगल अतिशय हिरवेगार आणि घनदाट होते . मला अशा जंगलातून एकट्याने चालायला फार आनंद मिळतो ! आपण स्वतः निसर्गाचा एक भाग आहोत याची जाणीव अशा ठिकाणी आल्यावर आपोआप होते . एरव्ही आपण आपल्या भोवती उभ्या केलेल्या सुख सुविधा आपल्याला निसर्गापासून वेगळे तोडून काढत असतात ! फ्रिजमध्ये चांगल्या दर्जाच्या आंतरराष्ट्रीय पॅकिंग मध्ये ठेवून दिलेला हापूस आंबा आणि झाडावर लटकलेला पाड आलेला हापूस आंबा यात जो फरक आहे तोच फरक एसीच्या झोतामध्ये सिमेंट काँक्रीटच्या जंजाळात अडकलेला सुखासीन  मनुष्य आणि जंगलात भटकणारा मनुष्य यांच्यामध्ये आहे असे मला वाटते .वरील उदाहरणातील सुखे उपभोगणारे दोन्ही जीव एक ना एक दिवस कोणाच्यातरी आनंदासाठी कापले जाणार हे निश्चित असते . उलट जंगलामध्ये असणारे जीव यथेच्छ आनंद उपभोगत त्यांच्या इच्छेने कधीतरी गळून पडतात आणि पुन्हा मातीतूनच मोठ्या जो...