पोस्ट्स

शोण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक २७ : नर्मदेचे उगमस्थान श्री क्षेत्र अमरकंटक

इमेज
मीरा माईंचे दर्शन घेतल्यानंतर मी सोबतच्या सर्वांना सांगितले की त्यांनी कृपया पुढे निघून जावे कारण मला एकट्याने चालायचे आहे .माझ्या विनंतीला मान देत सर्वजण पुढे निघून गेले आणि मी थोडा वेळ नर्मदा मातेचे ते बालरूप न्याहाळत बसलो . माझा अजूनही डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कारण इतकी लहान नर्मदा माता मी कधी पाहिलीच नव्हती ! काही ठिकाणी तर तिचे पात्र केवळ एक ते दीड फूट रुंदीचे होते .काठावरून जाताना तोल गेला तरी मनुष्य पलीकडे जाईल इतके सहज सोपे !  बालरूपातील नर्मदा मैया होय ,हा छोटासा झरा म्हणजे नर्मदा नदीच आहे ! इथे घनदाट अरण्य होते आणि झाडी खूप उंच व सदाहरित वाटत होती . इथे मला रस्त्याच्या कडेला टाकळा या झुडुपाची खूप सारी झाडे दिसली व भरपूर बिया देखील मिळाल्या .  नर्मदा नदीला समांतर असा एक रस्ता अमरकंटक पर्यंत गेलेला आहे . तो रस्ता धरून मी अमरकंटकची दिशा पकडली . मध्ये स्वामी विवेकानंदांचे एक केंद्र लागले . श्री रामकृष्ण कुटीर असे त्याचे नाव आहे .  इथे आत रामकृष्णांचे मंदिर आहे . स्वामी विवेकानंदांची एक मूर्ती