पोस्ट्स

खेडी घाट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक १४५ : दीडशे वर्षे वयाचे बर्फानी बाबा आणि बडवाहचे श्रीराम महाराज रामदासी

इमेज
पथराडच्या हनुमंताचे दर्शन घेऊन पहाटे निघालो . थेट किनारा पकडला . इथून मी फार गतीने वाटेतली गावे कापत पुढे पोहोचलो . चिराखान ( अर्थात चिरा दगडाची खाण असलेली जागा ) , बेगाव अथवा बेहगांव , पंड्याघाट , पितामली , चंदीपुरा ,कवड्या , सिटोक्का , निमगुल्या / निमगुळ , देवनाल्या  ,अर्धनारेश्वर (धारेश्वर ) ,दारुकेश्वर , बाथोली ,खैगाव , भामपुरा , गंगातखेडी , कपासतल , ढुआरे अशा मार्गे गेलो .वाटेतील प्रत्येक गावामध्ये अनेक मंदिरे आहेत त्या सर्वांचे दर्शन घेत पुढे गेलो . नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्हाला जितक्या वेळा मंदिरामध्ये जावे लागते तेवढे कदाचित आयुष्यात तुम्ही कधीच जात नसता . त्यामुळे अतिपरिचयात् अवज्ञा असे होण्याची शक्यता असते . अर्थात देवाबद्दल मनामध्ये चक्क अनादर उत्पन्न होऊ शकतो !तो होऊ नये आणि आपला भाव परिक्रमेच्यापहिल्या दिवशी पहिल्याच देवळातील पहिल्या देवाचे दर्शन घेताना जसा होता तसाच राहावा यासाठी परिक्रमावासींना विशेष प्रयत्न करावे लागतात !ऐकून हे कदाचित खोटे वाटेल परंतु ज्यांनी परिक्रमा केली आहे त्यांना मी काय म्हणतो आहे ते लक्षात येईल . असो . चालता चालता कडकडीत दुपार झाली . इथे एक ग...