पोस्ट्स

छोटी बरमान लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ४८ : सतधारा , सूर्यकुंड आणि परमपवित्र बर्मान घाट

इमेज
 शेर संगम घाटाचे नाव ग्वारी घाट असेच आहे . या ग्वारी घाटावर नर्मदा मातेला खूप मोठी साडी नेसवली होती . या काठावरून त्या काठावर मोठी केबल ताणून बांधलेली असते .त्यावर अग्निबाण लावून साडी सोडली जाते . पूर्वी धनुष्यबाणाने साडी सोडली जायची . रेवा नावाच्या गुजराती चित्रपटामध्ये माहेश्वर घाटावर चित्रित झालेले नर्मदेला साडी नेसवण्याचे अलौकिक दृश्य  काही ठिकाणी नावेने देखील साडी पलीकडे नेली जाते . या साडी नेसविण्याच्या विधीची छायाचित्रं वाचकांसाठी सोबत जोडत आहे .हा विधी खरोखरच बघण्यासारखा असतो . माझ्या आधी तिथून काही परिक्रमा वासी गेले होते त्यांनी हे फोटो काढले होते . आत्ता त्यांच्याकडून मला ते प्राप्त झाले .   शेर संगम  घाटावर नर्मदा मातेच्या जयंती चा सुरू असलेला उत्सव . मी साधूला याच माळा काढण्यासाठी मदत केली होती .  नर्मदा मातेला नेसविण्यात येणारी लांबच लांब साडी पुढे पुढे पात्राची रुंदी जशी वाढत जाईल तसतशा साड्या देखील मोठ्या होत जातात . परंतु प्रत्यक्ष साडी नेसवलीच जाते . अमरकंटकच्या जंगलामध्ये