लेखांक ३७ : घनदाट जंगलातली चाल आणि नर्मदा बुढी माय संगम
दिंडोरी शहरांमध्ये फारसे काही पाहण्यासारखे नव्हते . आणि इथला एकूण बकालपणा अस्वस्थ करत होता त्यामुळे लवकरात लवकर तिथून पुढे निघालो . इथे संघसंचलित इमलय कुटी नावाचा एक आश्रम आहे . बळीराम जाधव ला तो आश्रम बघायचाच होता . परंतु बाहेरून आश्रमाला कुलूप होते आणि आत मध्ये वनवासी मुले खेळत बसली होती . मी दारापाशी जाऊन चौकशी केली परंतु लॉकडाऊनमुळे आश्रम उघडणार नाही असे सांगण्यात आले . त्यामुळे त्या आश्रमाबाबत अधिक माहिती घेण्याची आमची संधी हुकली . संघ संचलित इमलय कुटी वनवासी आश्रमातील विद्यार्थी ( संग्रहित छायाचित्र ) इथून पुढे काठा काठा ने चालण्याचा मार्ग बंद झाला . दिंडोरी गावानंतर नर्मदा मैया चक्क ९० अंशाचे वळण घेत काटकोणात वळते .या भागातून कोणीच परिक्रमावासी जात नाही असे आम्हाला जागोजागी सांगण्यात आले .पुढचा मुक्काम देखील जवळपास कुठे नव्हता .त्यामुळे भरपूर चालायची तरी ठेवा असे सर्वजण सांगत होते . त्यामुळे पायांनी गती घेत निघालो . मध्ये एका पेट्रोल पंपाजवळ एका ब्राह्मणाचा धरम काटा अर्थात वे ब्रिज होता . त्याच्यावरती भरलेल्या ट्रकचे वजन केले जात असल्यामुळे याची अचूकता साधारण पाच किल