पोस्ट्स

पंचधारा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ३० : नर्मदा खंडातील एक अतुलनीय संत श्री रामदास बाबा

इमेज
रामदास बाबांनी पुन्हा काही त्या साधूचा विषय काढला नाही . यावरून त्यांच्यासाठी असे चमत्कार नित्याचेच होते हे लक्षात आले ,किंवा अशा चमत्कारांना साधकाने फारसे महत्त्व देऊ नये असा त्यांचा भाव असावा . तो मी पक्का आत्मसात करण्याचा निश्चय केला . आता या रामदास महाराजांविषयी तुम्हाला थोडेसे सांगावेच लागेल . संपूर्ण परिक्रमेमध्ये मला जे कोणी सर्वाधिक तपस्वी अद्भुत आणि अलौकिक महात्मे भेटले त्यातील सर्वोच्च क्रमांक रामदास महाराजांचा असायला हरकत नाही . ( ती माझी योग्यता किंवा लायकी खचितच नाही ,परंतु भौतिक पातळीवर हा प्रश्न अनेकांनी मला विचारला आहे म्हणून सांगतो आहे की किमान मला आलेल्या अनुभूतींच्या पातळीवर मला जाणवलेली क्रमवारी अशी आहे ) परमपूज्य श्री सियाराम बाबा तर सर्वांना ज्ञात आहेतच व त्यांचे मला आलेले अनुभव पुढे ओघाने सांगेनच . परंतु त्यांचा आश्रम तुलनेने सहजगम्य आहे .रामदास बाबांना भेटण्यासाठी तुम्हाला तुमचा जीव धोक्यात घालून प्रवास केल्याशिवाय दर्शन शक्य नाही . इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असून देखील रामदास बाबांनी आपले तपोसामर्थ्य असे काही वाढविलेले आहे की त्याच्या अनुभूती तुम्हाला पदोपदी येऊ

लेखांक २९ : दूधधारे पाशी भेटलेला अलौकिक साधू

इमेज
आजची चाल मोठी आव्हानात्मक होती .गीता स्वाध्याय मंदिरातून निघेपर्यंत अर्धा दिवस उलटून गेला होता. आणि पुढे जंगलची वाट सुरू होणार असल्यामुळे पायांना प्रचंड गती देणे अतिशय आवश्यक होते . कारण अंधार पडायच्या आत मला रामदास बाबांची ज्ञानेश्वरी कुटी गाठायची होती . परंतु अमरकंटक मधून वाहणारी नर्मदा माता इतकी सुंदर आहे की तिचे रूप पाहताच बसावे असे वाटते ! नर्मदा कुंडातून बाहेर पडल्या पडल्या नर्मदा माता पुन्हा थोडीशी लहान होते आणि थोड्याच अंतरावर घातलेल्या एका मोठ्या बंधाऱ्यामुळे एक विशाल स्वरूप धारण करते . असे छोटे मोठे अनेक बांध अमरकंटक च्या हद्दीमध्ये आहेत . इथे चांगले पक्के घाट बांधलेले असून त्या घाटावरती भाविकांची आणि स्थानिक लोकांची बऱ्यापैकी वर्दळ असते . उगमाचेच स्थान असल्यामुळे पाणी इतके स्वच्छ सुंदर आणि नितळ आहे की विचारू नका ! ज्याप्रमाणे एक दोन वर्षांची बाळे ही अतिशय तेजस्वी सुंदर आणि गोड दिसतात तशी ही नुकतीच जन्माला आलेली नर्मदा राणी दिसत होती ! तिचे ते रूप डावलून पुढे जाणारा कमनशिबीच म्हटला पाहिजे ! त्यामुळे मी अगदी किनारा पकडून काठाकाठाने चालू लागलो . या भागात नर्मदा टप्प्याटप्प्याने