पोस्ट्स

विक्रमपूर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक १९ : अखेर किनारा सापडला

इमेज
आज कहरच झाला ! डॉक्टर प्रल्हाद पटेल म्हणाले होते त्याप्रमाणे पाय रुळले आणि तब्बल ३६ ते ३८ किलोमीटर अंतर चालले ! पहाटेच्या अल्हाददायक वातावरणात निघालो होतो .सुंदर गारवा , रात्रभर पडलेल्या पावसाने भिजलेली धरणी , घनदाट धुकं, त्यातून पांढुरका दिसणारा सूर्य , उडणारे रंगीबेरंगी पक्षी , वनचर ,नितांत सुंदर वातावरण !  हे जंगल अतिशय समृद्ध आहे . संपूर्ण जंगलामध्ये रस्त्यावरची वाहतूक सोडली तर अजिबात मानवी वावर आढळत नाही .त्यामुळे इथले वन्य जीवन देखील समृद्ध आहे . पनपता राष्ट्रीय अभयारण्य आणि संजय नॅशनल पार्क व व्याघ्र प्रकल्प या दोन्ही वनांना जोडले गेलेले हे वनक्षेत्र आहे . बरेचदा आपल्याला असे वाटते की इतके छान जंगल असून आपल्याला वन्य प्राणी का दिसत नाहीत .प्रत्यक्षामध्ये वन्य प्राणी आपल्याला दिसत नसले तरी वन्य प्राण्यांना आपण दिसत असतो !आपल्या येण्याची चाहूल आधीच लागल्यामुळे ते सुरक्षित जागी लपून आपण जाण्याची वाट पाहत असतात . विशेषतः वन्य प्राण्यांपासून सुरक्षित राहायचे असेल तर पायाचा आवाज करत किंवा काठीचा आवाज करत जाणे अतिशय श्रेयस्कर .त्यामुळे ते सावध होतात आणि लपून बसतात .बरेचदा माणसे आणि हिं