पोस्ट्स

बैतुल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

• लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

इमेज
नर्मदा मातेचे सर्वप्रथम दर्शन मी भरूच मधील पुलावरून घेतलेले आहे . इथून रेल्वे जात असताना एकदा मला अचानक खूप ऊर्जा जाणवू लागली . काहीतरी शरीराखालून मुंग्या अंगात येत आहेत असा भास झाला !  म्हणून मी चटकन बर्थ वरून उठून खाली आलो आणि पाहिले तर रेल्वे गाडी नर्मदा मातेच्या पुलावरून चालली होती ! ते नर्मदा मातेचे आयुष्यातील पहिले दर्शन होते माझे ! त्याही वेळी नर्मदा मातेच्या काठावरील परिक्रमेचा मार्ग मला अगदी ठळकपणे दिसला होता वरून ! तिथून पुढे जेव्हा मी नर्मदा माता ओलांडली तेव्हा तेव्हा पुलावर थांबून तिचे साग्र संगीत दर्शन घेतले आहे . अगदी विमानातून सुद्धा नर्मदा मैयाचे खूप सुंदर दर्शन होते ते देखील मी अनेक वेळा केलेले आहे !  अमरावती जवळ पिंपळखुटा नावाचा एक आश्रम आहे .तिथे परमहंस सद्गुरु श्री शंकर महाराज नावाचे अतिशय थोर विभूतीमत्व , साक्षात संत निवास करतात . माझे एक मित्र श्री बाळासाहेब वाल्हेकर त्यांच्या दर्शनाकरिता दर गुरुवारी गेली तेरा वर्षे न चुकता वारी करत आहेत . पुणे ते आश्रम हे तब्बल ६६६ किलोमीटरचे अंतर बरेच वेळा ते स्वतः गाडी चालवत जातात व चालवत येतात ...