पोस्ट्स

ग्वारी घाट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

इमेज
आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये क्षौर करणे याला फार महत्त्व आहे . कारण मनुष्य कसा दिसणार हे बव्हंशी आपल्या केशरचनेवर अवलंबून असते . केस विस्कटलेला मनुष्य अस्ताव्यस्त दिसतो व केसांची निगा राखणारा मनुष्य सुस्वरूप दिसतो हे उघड सत्य आहे . त्यामुळे जन्मापासून माणसाचे आपल्या केसांवर फार प्रेम असते . त्यामुळे आपल्या जवळ असलेल्या मायेचे प्रकट स्वरूप म्हणून केसांकडे पाहिले जाते व मायेचा त्याग याचे प्रतीक म्हणून सर्वप्रथम केसांचा त्याग केला जातो .  परिक्रमेदरम्यान पुन्हा केस व नखे यांना हात लावायला परवानगी नसते . परिक्रमा पूर्ण होईपर्यंत नखे व केस यांची मुक्त वाढ होऊ द्यायची असते .भारतात सर्वत्र ही प्रथा दिसते . अगदी दक्षिण भारतातील अय्यप्पाची यात्रा करणारे लोक किंवा आंध्रात श्रीशैल्यम मल्लीकार्जुनाचे महाशिवरात्र व्रत करणारे देखील ही प्रथा महिनाभर पाळतात . मी घाटावरती गेलो .अभिषेक त्रिपाठी नामक एका ब्राह्मणाने मला बोलावले व काय हवे विचारले .मी केश कर्तन करावयाचे आहे हे सांगितल्यावर त्याने शेजारून चाललेल्या राम लखन सेन नामक नाभिकाला हाक मारली व त्याचे सोबत मला पाठविले . माझ्या शहरी मेंद

लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट

इमेज
ग्वारी घाटाचे महात्म्य तर तुम्हाला सांगितले .नर्मदे काठी भेटलेल्या त्या साधूने मला सांगितले , " इथे दोन चांगले आश्रम आहेत .एक धुनीवाले बाबांचा आश्रम आहे आणि दुसरा झुलेलाल आश्रम आहे . झुलेलाल आश्रमामध्ये गेलास तर तिथे एक साधू आहे . तो तुला सर्व माहिती देईल परिक्रमेची . " हा नर्मदा मातेचा आदेश मानून मी झुलेलाल आश्रमामध्ये गेलो .आश्रम अतिशय सेवाभावी वृत्तीने चालविला जातो आणि इथे नित्य परिक्रमा वासियांची ये जा सुरू असते .मुन्ना नामक एक सेवक , एक अपंग गुरुजी , अजून दोन विमनस्क माणसे आणि दोन बायका असे पाच जण मिळून सर्व डोलारा सांभाळतात .जय झुलेलाल अन्न (क्षेत्र ) , माँ नर्मदा सेवा समिती ,असे शिक्क्यावर असलेले आश्रमाचे नाव आहे .  आश्रमाचे प्रमुख असलेले स्थूल असे एक सिंधी गृहस्थ आहेत ते रोज तिथे न चुकता येतात आणि जातीने सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालतात . इथे भोजन प्रसाद घेण्यासाठी अनेक याचक भटके अनाथ अपंग बाहेर ताटकळत उभे असतात .अगदी घाटावर फिरणाऱ्या गाई सुद्धा या आश्रमाच्या बाहेर येऊन काहीतरी खायला मिळेल याची वाट पाहत उभ्या असतात . कानाला ऐकायला अतिशय विचित्र वाटेल अशा पद्ध

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

इमेज
ग्वारी घाटा विषयी दोन शब्द लिहिल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही ! नर्मदा मैया च्या काठावर जितके म्हणून घाट दुतर्फा आहेत त्यातील सर्वात मोठा , सर्वात लांब व सर्वात व्यग्र घाट म्हणजे जबलपूर येथील ग्वारी घाट होय . इथे नर्मदा नदीचे भव्य दिव्य स्वरूपामध्ये दर्शन होते . जयपुर येथील लाल दगडातून बांधलेला औरस चौरस पसरलेला हा घाट अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे . जबलपूर महानगरपालिका या घाटाची विशेष काळजी घेते . पार्वती मातेने अर्थात गौरीने इथे तपश्चर्या केली म्हणून खरे तर या घाटाचे नाव गौरी घाट असे आहे परंतु स्थानिक लोकांनी त्याचा अपभ्रंश करून ग्वारी अथवा गुवारी घाट असे नाव रूढ केले आहे . इथल्या लोकांनी सरकारला निवेदन देऊन या घाटाचे नाव पुन्हा एकदा गौरी घाट करावे असे सुचविलेले आहे . घाटाची लांबी इतकी आहे की चालून चालून मनुष्य कंटाळतो परंतु घाट संपत नाही . आणि इतका लांब घाट असून देखील प्रत्येक फुटावर कोणी ना कोणी नर्मदा नदीमध्ये स्नान करताना तुमच्या दृष्टीपथास पडते . या घाटावर नेहमीच गर्दी राहते . घाटावर अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत .   ग्वारी घाटावरून समोर दिसणारा गुरुद्वारा आणि