पोस्ट्स

उमराली लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक १२९ : शूलपाणी झाडीच्या उत्तर तटावरील राणीकाजल माता आणि मथवाडची नेहा

इमेज
नर्मदा मातेच्या उत्तर तटावरून माझी मार्गक्रमणा सुरू होती . हांफेश्वर ओलांडले म्हणजे उत्तर तटावरील शूल पाणीच्या झाडीचा मध्यभाग आला होता . वरील नकाशा मध्ये हिरव्या रंगाने दाखवलेला भाग म्हणजे शूलपाणी ची झाडी आहे . हिच्या मधोमध नर्मदा माई वाहते आहे . खाली महाराष्ट्र आणि वरती गुजरात व मध्य प्रदेशाच्या सीमा आहेत . महाराष्ट्रातील तोरणमाळ अभयारण्य , गुजरात मधील शूलपाणेश्वर अभयारण्य आणि गुजरात मध्य प्रदेश सीमेवरील रतनमहल अस्वल अभयारण्य हा सर्व शूलपाणी झाडीचाच भाग आहे . हाफेश्वर हा झाडीचा मध्यभाग असून लाल रंगाने दाखवला आहे .  इथून पुढे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत . मला देवा दादा ने सर्व मार्ग समजावून सांगितले होते . प्रत्येकाला आपला मार्ग निवडता यावा म्हणून सर्वच मार्ग इथे व्यवस्थित देतो आहे . कृपया नीट अभ्यासावेत . सर्वात पहिला मार्ग जो खरा परिक्रमा मार्ग होता तो आता १००% जलमग्न झाला आहे याची कृपया नोंद घ्यावी . त्यामुळे जुन्या पुस्तकांमध्ये सापडणारे उल्लेख आणि मंदिरे तुम्हाला इथे आता सापडणार नाहीत .  किंबहुना सरदार सरोवर धरणाची उंची दर काही वर्षांनी थोडी थोडी वाढवली जात आहे...