पोस्ट्स

कन्यापूजन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ८ : जो तेरा संकल्प वही मेरा संकल्प

इमेज
क्षौर करून मी निघालो आणि सदानंद गिरी बाबांकडून पुढील आदेश येण्याची वाट पाहू लागलो .  क्षौर केल्यावरचे प्रस्तुत लेखकाचे रुप काहीसे असे होते  वाटेमध्ये मला शिवशंकर तिवारी नावाचा एक अत्यंत तेजस्वी आणि सज्जन पुजारी भेटला . जो मोटरसायकल वरून जाता जाता वाटेत जमलेल्या माकडांना केळी खाऊ घालत होता .त्याच्याशी बोलल्यावर असे लक्षात आले की तो रोज हे काम करतो .मारुतीरायाची सेवा समजून माकडांना केळी खाऊ घालतो . लोक देखील त्याला सहकार्य करतात , कारण त्यांनी केळी खाऊ घातल्यामुळे पोट भरलेली माकडे दिवसभर गावांमध्ये फिरून कोणाला त्रास देत नाहीत .  त्याच्याकडून संकल्प सोडावा अशी माझ्या मनात इच्छा होती परंतु नर्मदेच्या काठी आपण आपल्या इच्छा गुंडाळून ठेवायचे असतात हे मला अजून माहिती नव्हते . मी शिवशंकर तिवारी पुजारी यांच्याशी बोलत असताना एक हुशार तरुण मुलगा तिथे आला व माझी आणि पंडितजींची परीक्षा घेऊ लागला . त्याचे प्रश्न देखील मजेशीर होते परंतु मूलगामी होते . सुमारे तास दीड तास आमच्या तिघांचा शास्त्रार्थ चालला होता .त्यांची विद्वत्ता , साधेपणा आणि नम्रता माझ्या मनाला खूपच भावली .मी पु