पोस्ट्स

मोहदी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक २२ : अचानकमार व्याघ्र महारण्यात प्रवेश

इमेज
यह नर्मदाखण्ड है। यहां कुछ भी देकर मत जाओ । जितना हो सके यहां से लेकर जाओ ।  साधूचे हे वाक्य माझ्या मनावर पक्के कोरले गेले. त्याला नर्मदे हर करून आम्ही दोघांनी (मोहन साधू व मी) . काढता पाय घेतला . पुन्हा एकदा नर्मदा मातेचा किनारा पकडला . आता मात्र माझ्या पायांना इतकी गती आली की मी त्या साधूला देखील मागे टाकत थेट दम्हेडी गाव गाठले . अखंड डांबरी रस्त्याने चालून विटलेल्या माझ्या सह्यभ्रमंतीमध्ये रमणाऱ्या पायांना चिखलाचा , मातीचा तो मऊशार स्पर्श खरोखरीच सुखावह भासत होता , त्याचाच हा परिणाम असावा .  (प्रतिनिधिक चित्र ) दम्हेडी पासून मात्र पुन्हा एकदा काँक्रीट चा एक मार्ग लागला आणि तिथून तो मोहन साधू जो सुसाट सुटला तो पुन्हा कधीही मला दिसला नाही .त्याने त्याचे कार्य अतिशय चोख बजावले . त्याने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधायचा मी खूप वेळा प्रयत्न केला परंतु तो क्रमांक अस्तित्वात नाही असाच संदेश ऐकू येतो . असो . नर्मदा मातेचे आणि त्या साधूचे आभार मानावेत तितके कमीच आहेत . माझ्या कल्पनेतली स्वप्नातली परिक्रमा वास्तवामध्ये देखील करता येते हे त्या साधूने मला नर्मदा मातेच्या आदेशाने शि