( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा ! २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...
पुनर्वनीकरण प्रकल्प लेखाजोखा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नर्मदे हर!
शूलपाणी झाडीतील पुनर्वनीकरण प्रकल्पाचा संपूर्ण जमा खर्च अथवा लेखा जोखा खालीलप्रमाणे आहे.
यातील सर्व दान थेट दिनेश फोदला पावरा यांच्या खात्यात गेलेले असून प्रस्तुत लेखकाची भूमिका केवळ योजकाची आहे याची कृपया नोंद घ्यावी.
सर्व दात्यांचे आणि शुभचिंतकांचे मनापासून आभार !
प्रकल्प समन्वयक रेवाभक्त वृक्षसखी डॉ. सीमाताई खोत दादर यांचे विशेष आभार ! वृक्षमित्र श्री आनंद मुळे आणि परिक्रमावासी श्री महेश माधव कुलकर्णी पुणे यांचेही मनःपूर्वक आभार !
शूलपाणी झाडी पुन्हा एकदा घनदाट करण्याच्या संकल्पास नर्मदा माता बळ देवो!
नर्मदे हर!
शूलपाणी झाडीतील पुनर्वनीकरण प्रकल्पाचा संपूर्ण जमा खर्च अथवा लेखा जोखा
टिप्पण्या
जे आवडते सर्वांना ...
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका (जे प्रकरण वाचायचे आहे त्याच्यावर क्लिक करा . तसेच हे लिखाण अजून पूर्ण झालेले नाही त्यामुळे नवीन लेखन वाचण्याकरिता पुन्हा पुन्हा भेट देत राहणे ही प्रार्थना !) ० नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी १ लेखांक एक : नर्मदे हर २ लेखांक दोन : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात ३ लेखांक तीन : चोराची धन ४ लेखांक चार : झूठा कही का ! सब कुछ तो लाये हो ! ५ लेखांक पाच : ग्वारी घाट जबलपूर मध्य प्रदेश ६ लेखांक सहा : झुलेलाल आश्रम ग्वारी घाट ७ लेखांक सात : नाभिकाने केलेला जाहीर _ मान ८ लेखांक आठ : जो तेरा संकल्प वही मेरा संकल्प ९ लेखांक नऊ : इंदोरी पोहे आणि गरमागरम जिलेबी १० लेखांक दहा : या स्वामी जेवायला ११ लेखांक अकरा : पहिला मुक्काम १२ लेखांक बारा : वेश धरावा बावळा १३ लेखांक तेरा : दत्तप्रभूंची इच्छा १४ लेखांक चौदा : सकरी गावचा लम्मू लाल विश्वकर्मा १५ लेखांक पंधरा : अखंड भारताचे नाभीस्थान १६ लेखांक सोळा : प्रभूजी का भंडार १७ लेखांक सतरा : कोल्ह्याने शिकविलेला धडा १८ लेखांक अठरा : मुंडा महारण्यामध्ये प्रवेश १९ लेखांक एकोणीस : अखेर किनारा सापडला २० लेखांक वीस : नर्मदेने खास पाठविलेला साधू २१ लेखांक एकव...
नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा ! २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...
• लेखांक १ : नर्मदे हर !
नर्मदे हर ! परमहंस परिव्राजकाचार्य श्री अवधूतानंद महाराज अर्थात पूर्वाश्रमीचे श्री जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेले नर्मदे ss हर हर हे पुस्तक वाचल्यापासून नर्मदा जलाचा खळखळाट कानाला रुंजी घालत होता .कृष्णमेघ आणि चैतन्य हे त्यांचे दोन्ही चिरंजीव मुलखाचे अवलिया आणि कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यामुळे खात्री होती की पुस्तकातले अनुभव बऱ्यापैकी अद्भुत आणि सत्य असणार . माझ्याकडे नर्मदे हर या पुस्तकाची स्वतः कुंटे यांनी स्वाक्षरी केलेली प्रत आहे ! प.प. अवधूतानंद महाराज ( पूर्वाश्रमीचे श्री जगन्नाथ कुंटे ) अवधूतानंद स्वामी यांची स्वाक्षरी असलेली प्रत परंतु खरे सांगायचे तर त्यातील काही गोष्टी ह्या अतिरंजीत आहेत असे मला विनाकारण वाटायचे .तसेच त्यांनी पुस्तक मेधा पाटकर यांना अर्पण केले होते ते देखील मला मान्य नव्हते , कारण मी माझ्या महाविद्यालयीन जीवनात मेधा पाटकर यांच्याबरोबर जवळून काम केलेले होते व त्यांच्या कामाचे "खरे गमक" मला पक्के उमगल्यामुळे मी त्या कामातून बाहेर पडलो होतो . त्यांची बाकीची अनेक पुस्तके देखील मी वाचली आहेत . परंतु नर्मदे हर या पुस्तकातील त्या...
• लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात
नर्मदा मातेचे सर्वप्रथम दर्शन मी भरूच मधील पुलावरून घेतलेले आहे . इथून रेल्वे जात असताना एकदा मला अचानक खूप ऊर्जा जाणवू लागली . काहीतरी शरीराखालून मुंग्या अंगात येत आहेत असा भास झाला ! म्हणून मी चटकन बर्थ वरून उठून खाली आलो आणि पाहिले तर रेल्वे गाडी नर्मदा मातेच्या पुलावरून चालली होती ! ते नर्मदा मातेचे आयुष्यातील पहिले दर्शन होते माझे ! त्याही वेळी नर्मदा मातेच्या काठावरील परिक्रमेचा मार्ग मला अगदी ठळकपणे दिसला होता वरून ! तिथून पुढे जेव्हा मी नर्मदा माता ओलांडली तेव्हा तेव्हा पुलावर थांबून तिचे साग्र संगीत दर्शन घेतले आहे . अगदी विमानातून सुद्धा नर्मदा मैयाचे खूप सुंदर दर्शन होते ते देखील मी अनेक वेळा केलेले आहे ! अमरावती जवळ पिंपळखुटा नावाचा एक आश्रम आहे .तिथे परमहंस सद्गुरु श्री शंकर महाराज नावाचे अतिशय थोर विभूतीमत्व , साक्षात संत निवास करतात . माझे एक मित्र श्री बाळासाहेब वाल्हेकर त्यांच्या दर्शनाकरिता दर गुरुवारी गेली तेरा वर्षे न चुकता वारी करत आहेत . पुणे ते आश्रम हे तब्बल ६६६ किलोमीटरचे अंतर बरेच वेळा ते स्वतः गाडी चालवत जातात व चालवत येतात ...
• लेखांक ३ : चोराची धन
मनोमन अशी इच्छा मी करीत होती की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये (डिसेंबर २०२१ ) कुठल्याही परिस्थितीमध्ये परिक्रमा उचलायचीच ! जोपर्यंत आपण नर्मदा परिक्रमा करत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःच्या इच्छेने वागण्याची खूप सवय झालेली असते ! एकदा नर्मदा परिक्रमा झाली की आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नष्ट होऊन जातात आणि केवळ देवाच्या इच्छेने वर्तावे ।देव करील ते मानावे । मग सहजची स्वभावे । कृपाळू देव ॥ या समर्थ उक्तीप्रमाणे वागण्याची सवय अंगी बाणते ! तसेच काहीसे घडले . परिक्रमेची इच्छा केली तर होती परंतु अचानक अमरावतीच्या शंकर महाराजांचा पुणे दौरा ठरला . पुण्यामध्ये धनकवडी येथे शंकर महाराजांची समाधी आहे .यांची देखील एक जबरदस्त अनुभूती मला परिक्रमे दरम्यान आली ती योग्य वेळी सांगतो , परंतु हे शंकर महाराज निराळे आणि मी उल्लेख करतो आहे ते शंकर महाराज निराळे . मी उल्लेख करतो आहे ते शंकर महाराज अजूनही देहामध्ये आहेत . शंकर बाबांचा हा ऐतिहासिक दौरा होता ज्यामध्ये ते भक्तांच्या नियोजनानुसार हेलिकॉप्टरने पंढरपूरला गेले व तेथील नवीन आश्रमाचे उद्घाटन करून हेलिकॉप्टरने पुण्याला आले व पुन्हा हेलिकॉप्टरने पिंपळखुट्याला...
• लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !
जबलपूर स्थानकावर उतरलो आणि बाहेर आलो . जबलपूर बद्दल मी खूप वर्षांपासून ऐकून होतो . सज्जनगडावर येणाऱ्या एक रामदासी साध्वी पूज्य कमलताई पटवर्धन (रामदासी) यांचा जबलपूर येथे मठ होता .यांनी स्वतः १९७२ / ७३ साली दोन पायी परिक्रमा केलेल्या होत्या व त्यांच्या अनुभूती देखील अलौकिक अशा होत्या . त्यांचा आश्रम कुठे आहे हे मला माहिती नव्हते परंतु "इंद्रपुरी कॉलनी , ग्वारी घाट मार्ग " असा त्यांचा पत्ता माझ्या डोक्यामध्ये पक्का बसलेला होता .मला असे वाटले की जबलपूर स्थानकापासून नर्मदा मातेचा काठ जवळ असेल परंतु चौकशी केली असता असे सांगण्यात आले की तिथून नर्मदा मैयाचा काठ आठ किलोमीटर लांब आहे ! "आठ किलोमीटर पायी चालायचे ? ?" असा मोठा प्रश्न मला त्या क्षणी पडला होता हे प्रामाणिकपणे नमूद करतो ! परंतु खिशात दमडी नसल्यामुळे पर्याय देखील नव्हता .त्यामुळे शांतपणे ग्वारी घाटचा रस्ता पकडला . वाटेत एक शेअर रिक्षावाला माझ्या शेजारी थांबला आणि मला म्हणाला , " बाबाजी बैठ जाओ । " बाबाजी वगैरे कोणी मला म्हणते आहे अशी अजिबात सवय नव्हती , त्यामुळे मौज वाटली आणि मी त्याला म्हणा...
लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश
ग्वारी घाटा विषयी दोन शब्द लिहिल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही ! नर्मदा मैया च्या काठावर जितके म्हणून घाट दुतर्फा आहेत त्यातील सर्वात मोठा , सर्वात लांब व सर्वात व्यग्र घाट म्हणजे जबलपूर येथील ग्वारी घाट होय . इथे नर्मदा नदीचे भव्य दिव्य स्वरूपामध्ये दर्शन होते . जयपुर येथील लाल दगडातून बांधलेला औरस चौरस पसरलेला हा घाट अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे . जबलपूर महानगरपालिका या घाटाची विशेष काळजी घेते . पार्वती मातेने अर्थात गौरीने इथे तपश्चर्या केली म्हणून खरे तर या घाटाचे नाव गौरी घाट असे आहे परंतु स्थानिक लोकांनी त्याचा अपभ्रंश करून ग्वारी अथवा गुवारी घाट असे नाव रूढ केले आहे . इथल्या लोकांनी सरकारला निवेदन देऊन या घाटाचे नाव पुन्हा एकदा गौरी घाट करावे असे सुचविलेले आहे . घाटाची लांबी इतकी आहे की चालून चालून मनुष्य कंटाळतो परंतु घाट संपत नाही . आणि इतका लांब घाट असून देखील प्रत्येक फुटावर कोणी ना कोणी नर्मदा नदीमध्ये स्नान करताना तुमच्या दृष्टीपथास पडते . या घाटावर नेहमीच गर्दी राहते . घाटावर अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत . ग्वारी घाटावरून समोर दिसणारा गुरुद्वारा...
लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट
ग्वारी घाटाचे महात्म्य तर तुम्हाला सांगितले .नर्मदे काठी भेटलेल्या त्या साधूने मला सांगितले , " इथे दोन चांगले आश्रम आहेत .एक धुनीवाले बाबांचा आश्रम आहे आणि दुसरा झुलेलाल आश्रम आहे . झुलेलाल आश्रमामध्ये गेलास तर तिथे एक साधू आहे . तो तुला सर्व माहिती देईल परिक्रमेची . " हा नर्मदा मातेचा आदेश मानून मी झुलेलाल आश्रमामध्ये गेलो .आश्रम अतिशय सेवाभावी वृत्तीने चालविला जातो आणि इथे नित्य परिक्रमा वासियांची ये जा सुरू असते .मुन्ना नामक एक सेवक , एक अपंग गुरुजी , अजून दोन विमनस्क माणसे आणि दोन बायका असे पाच जण मिळून सर्व डोलारा सांभाळतात .जय झुलेलाल अन्न (क्षेत्र ) , माँ नर्मदा सेवा समिती ,असे शिक्क्यावर असलेले आश्रमाचे नाव आहे . आश्रमाचे प्रमुख असलेले स्थूल असे एक सिंधी गृहस्थ आहेत ते रोज तिथे न चुकता येतात आणि जातीने सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालतात . इथे भोजन प्रसाद घेण्यासाठी अनेक याचक भटके अनाथ अपंग बाहेर ताटकळत उभे असतात .अगदी घाटावर फिरणाऱ्या गाई सुद्धा या आश्रमाच्या बाहेर येऊन काहीतरी खायला मिळेल याची वाट पाहत उभ्या असतात . कानाला ऐकायला अतिशय विचित्र वाटेल अशा पद्ध...
लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !
सगळे आटोपून निघेपर्यंत वेळ झाली होती ११ : ११ ! सूर्य चांगलाच तळपत होता , त्यामुळे थंडी जाणवत नव्हती .नर्मदेच्या काठाकाठाने चालत चालत निघालो . माझ्या असे लक्षात आले की वाटेत लोकच तुम्हाला रस्ता सांगतात .लोक सांगू लागले ,बाबाजी यहा से जाओ । बाबाजी वहा से जाओ । त्याप्रमाणे पुढे चालत राहिलो . वाटेमध्ये एक आयुर्वेदिक महाविद्यालय लागले . मला कोणीतरी असे सांगितले होते की मध्येच पोलीस तुम्ही करोना लस घेतली आहे का नाही याची तपासणी करतात व लस घेतली नसेल तर घरी पाठवतात . मी एक डोस कागदोपत्री घेतला होता . त्यामुळे दुसरा डोस मिळतो का ते पाहण्याकरता आयुर्वेदिक कॉलेजमध्ये चौकशी केली . तिथले मुख्य डॉक्टर भेटले . त्यांनी सांगितले , तुम्ही कुठलीही चिंता करू नका . ही नर्मदा माता आहे .हिच्या काठावरती अन्य कोणाचेही नियम चालत नाहीत . मैय्या के किनारे करोना फिरोना कुछ नही चलता ! त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे चालत रहा . संपूर्ण कोरोना काळामध्ये देखील नर्मदा परिक्रमा व्यवस्थित चालू होती आणि एकाही परिक्रमा वासीला करोना झालेला नाही हे त्यांनी मला आवर्जून सांगितले .एका डॉक्टरचा देखील नर्मदा म...
लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !
आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये क्षौर करणे याला फार महत्त्व आहे . कारण मनुष्य कसा दिसणार हे बव्हंशी आपल्या केशरचनेवर अवलंबून असते . केस विस्कटलेला मनुष्य अस्ताव्यस्त दिसतो व केसांची निगा राखणारा मनुष्य सुस्वरूप दिसतो हे उघड सत्य आहे . त्यामुळे जन्मापासून माणसाचे आपल्या केसांवर फार प्रेम असते . त्यामुळे आपल्या जवळ असलेल्या मायेचे प्रकट स्वरूप म्हणून केसांकडे पाहिले जाते व मायेचा त्याग याचे प्रतीक म्हणून सर्वप्रथम केसांचा त्याग केला जातो . परिक्रमेदरम्यान पुन्हा केस व नखे यांना हात लावायला परवानगी नसते . परिक्रमा पूर्ण होईपर्यंत नखे व केस यांची मुक्त वाढ होऊ द्यायची असते .भारतात सर्वत्र ही प्रथा दिसते . अगदी दक्षिण भारतातील अय्यप्पाची यात्रा करणारे लोक किंवा आंध्रात श्रीशैल्यम मल्लीकार्जुनाचे महाशिवरात्र व्रत करणारे देखील ही प्रथा महिनाभर पाळतात . मी घाटावरती गेलो .अभिषेक त्रिपाठी नामक एका ब्राह्मणाने मला बोलावले व काय हवे विचारले .मी केश कर्तन करावयाचे आहे हे सांगितल्यावर त्याने शेजारून चाललेल्या राम लखन सेन नामक नाभिकाला हाक मारली व त्याचे सोबत मला पाठविले . माझ्या शहरी ...
नर्मदे हर
उत्तर द्याहटवाNarmade Har !!!!!
उत्तर द्याहटवाSalute!!!!!
उत्तर द्याहटवा