पोस्ट्स

मणिनागेश्वर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक १०४ : गुप्त गोदावरी,शाश्वत मारुती धाम , मणिनागेश्वर आणि गौतमेश्वर

इमेज
सरसाड गावामध्ये गुप्त गोदावरी माते चे मंदिर आहे . मी आत्ता जी मोठी नदी ओलांडली तिला ही गुप्त गोदावरी माई जाऊन मिळते . त्यामुळे या मोठ्या नदीला सुद्धा गुप्त गोदावरी मैय्या असेच म्हणतात . इथे त्र्यंबकेश्वराचे सुद्धा मंदिर आहे . एक गोमुख आहे .आणि एक व्याघ्रमुख आहे . या स्थानाचे महात्म्य नर्मदा पुराणा मध्ये सांगितलेले आहे . खरे सांगायचे तर नर्मदा मातेचा इथून पुढचा काही किलोमीटरचा किनारा हा अक्षरशः तप्त तपोभूमी आहे ! इथे प्रत्येक पावलाला एवढी जबरदस्त स्पंदने जाणवतात की विचारू नका ! जणूकाही प्रत्येक फुटावर कोणी ना कोणी साधनेला कधी न कधी बसले असावे अशी अवस्था या किनाऱ्याची आहे . अतिशय जबरदस्त असा हा टप्पा आहे . त्यामुळे नर्मदा पुराणा मध्ये या भागातील तीर्थक्षेत्रांचे आलेले वर्णन सांगत बसलो तर हा एक भाग पुरायचा नाही त्याचे दहा भाग होतील . त्यामुळे मी असे ठरविले आहे की सर्व लिखाण पूर्ण झाल्यावर नर्मदा पुराणात आलेली तीर्थवर्णने या विषयावर वेगळे लिखाण शेवटच्या काही भागांमध्ये करावे . तसेही नर्मदा पुराणाचे वाचन मी परिक्रमा संपल्यावरच केले होते . त्यामुळे आत्ता परिक्रमेमध्ये मला नर्मदा पुरणातील काह