सौरचूल , गोबरगॅस व निर्धूर चूल

 नर्मदे हर ! आपण सर्वजण जाणता त्याप्रमाणे शूलपाणी च्या झाडीमध्ये पुनर्वनीकरण करण्याचा आपला संकल्प आहे .

चातुर्मासामध्ये बंद असलेली नर्मदा परिक्रमा आता सुरू होत आहे . दररोज १०० ते १५० परिक्रमावासी भाबरी आश्रमात भोजनासाठी येणार आहेत . तसेच आपण इथे सुरू केलेली शाळा सुंदर पद्धतीने सुरू आहे . तिथे सुमारे १०० विद्यार्थी दररोज येत आहेत . त्यांना देखील माध्यान्ह भोजन देण्याचा संकल्प आपण करत आहोत . या सर्वांसाठी इथे केवळ चूल हे एकमेव स्वयंपाकाचे साधन उपलब्ध आहे . त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडे लागतात . या भागात आता लाकडे शिल्लक नाहीत . त्यामुळे दूरवर जाऊन लाकडे तोडून आणावी लागतात . यामुळे आपला पुनर्वनीकरणाचा हेतू साध्य होत नाही . 

यावर उपाय म्हणून सौरचूल ,गोबरगॅस आणि धुरविरहित कमी लाकूड लागणारी चूल असे तीन पर्याय आहेत . हे तीनही योग्य प्रकारे वापरले तर लाकडांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो . धुळे येथील श्री राहुल कुलकर्णी नावाचे उद्योजक या तीनही गोष्टींचे उत्पादन स्वतः करतात . प्रस्तुत लेखक त्यांना प्रत्यक्ष भेटून आला आहे व त्यांच्याकडून या गोष्टींचे अंदाजपत्रक (कोटेशन ) त्याने आणलेले आहे . ते सोबत जोडत आहे . कृपया यासाठी आपल्याला काही मदत करता आली तर आम्हाला अवश्य कळवावे . आपण आपली मदत थेट दिनेश पावरा यांच्या जिपे खात्यावर पाठवू शकता . मदत पाठवल्यावर खालील ई-मेल आयडीवर कळवावे कारण दिनेश पावरा यांच्या इथे रेंज नसते . mazinarmadaparikrama@gmail.com 



टिप्पण्या

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर