पोस्ट्स

थवडीया लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ९१ : सरदार सरोवराची भिंती आणि जगातील सर्वात भव्य दिव्य "ऐक्यमूर्ती " statue of unity

इमेज
शूलपाणीच्या जंगलातून चालण्याचा आनंद मिळालेल्या आमच्या काळातील काही लोकांच्या परिक्रमा , या शेवटच्या परिक्रमा ठरल्या . कारण आता सगळीकडे डांबरी रस्ते झालेले आहेत .झाडीच्या प्रत्येक गावातून आता डांबरी सडकांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे असे नकाशा पाहिल्यावर लक्षात येते . मी देखील माथासर येथून निघाल्यावर संपूर्ण जंगलातून चाललो . परंतु आता माथासर ते झरवानी पक्का रस्ता झालेला दिसतो आहे . जंगलातील वाटा तुडवत चालत होतो . आजूबाजूला झाडी असल्यामुळे फारसे काही दिसत नव्हते . अजूनही डोंगरांचे चढ-उतार सुरू होते . बरेच अंतर चालल्यावर डावीकडे एक कुटी वजा आश्रम दिसू लागला . इथे देखील अर्धा मुर्धा रस्ता खणून ठेवला होता याचा अर्थ इथून रस्ता जाणार हे लक्षात येत होते . हा गजानन महाराज आश्रम होता . इथे कोणीतरी मराठी संचालक भेटणार हे लक्षात आले आणि आनंद वाटला !  संत श्री गजानन महाराज आश्रम झरवानी गुजराती लोक गजानन चा उल्लेख नेहेमी गजानंद असाच करतात ! आश्रम आता खूप छान झालेला दिसतो आहे आम्ही गेलो तेव्हा असा साधा होता इथे सर्व परिक्रमा वासी आवर्जून थांबतात क्षणभ...