पोस्ट्स

नाहिलीसंगम लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक ७७ : बुराड संगम ,देव संगम, कपिला संगम लोहारा आणि नाहिली संगमी सहस्त्रयज्ञाख्य तीर्थ मोहीपुरा

इमेज
ग्यारहलिंगी आश्रमातून भल्या पहाटे मी निघालो खरा . परंतु अशा रीतीने अंधारामध्ये बाहेर पडणे परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही . त्यामुळे त्याचे बसायचे ते सर्व फटके मला बसले ! वाटेमध्ये मला प्रचंड वन्यजीव भेटले . अनेक कोल्हे मला आडवे गेले . मोठे घुबड पाहिले . अंधारात अज्ञात जनावरे पळण्याचे आवाज ऐकले . पाण्यातून दोन खोल ओढे ओलांडताना माझ्या मनाची अवस्था काय झाली होती ही माझी मलाच माहिती ! त्यात ओढे ओलांडून भिजल्यामुळे पुढे चालताना अखंड थंडी वाजू लागली . अजूनही झाडी कमी झाली नव्हती .अंधुक दिसू लागले होते .   ग्यारह लिंगी आश्रम सोडून काठाकाठाने पुढे निघाल्यावर डावीकडे अशी घनदाट झाडी आहे . नर्मदा मैया जिथे जमिनीला स्पर्श करते तिथून चाललात तरच चालण्यापूर्ती जागा मिळते अन्यथा चालता येत नाही . परंतु नर्मदेच्या कृपेने मला प्रत्येक वेळी एक पाऊल ठेवण्या पुरती तरी जागा मिळाली . आपण वरून खाली चालत आहोत . हेच ते दोन ओढे जे मी अंधारात पाण्यामध्ये उतरून पार केले . मला असे वेडे साहस करायची इच्छा त्यादिवशी का झाली माहिती नाही . परंतु हे परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही .तरी क...