पोस्ट्स

कुदै लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक १८ : मुंडा महारण्यामध्ये प्रवेश

इमेज
शहापूरा पासूनच्या पुढच्या वन प्रदेशाला मुंडा महारण्य असे नाव आहे . फार पूर्वी इथे अतिशय घनदाट अरण्य होते आता विरळ झाडी शिल्लक आहे . जंगलातून चालता चालता एक छोटासा घाट लागला .मला हळूहळू आता भुकेची जाणीव होऊ लागली . घाटामध्ये डाव्या हाताला खाली एक छोटीशी कुटी दिसली .आतून एका बाबांनी आवाज दिला .                        बंजरकुटी आश्रम  छीहार बाबांची शिष्य चेतराम बाबाजी म्हणून इथे राहत होते . या आश्रमाला बंजर कुटी (वनचर कुटी) म्हणत . काळ्या रंगाचा गॉगल आणि काळे कपडे घातलेले बाबांचे फोटो आश्रमात लावलेले होते . इथे खाली एक छोटासा झरा होता . एक-दोन छोटी मंदिरे  होती. सकाळचे नऊ वाजले असावेत . बाबा मला म्हणाले भोजन प्रसाद घेऊन पुढे जा .मी म्हणालो मला अजून बरेच चालायचे आहे तरी काही बालभोग असेल तर घेतो .अल्पोपाहार किंवा नाश्ता याला परिक्रमेच्या अथवा साधूंच्या भाषेमध्ये बालभोग असे म्हणतात .याने जंगलामध्ये उगवणाऱ्या कुदै नावाच्या धान्याची अप्रतिम खिचडी मला बालभोग म्हणून चारली .ही खिचडी इतकी चविष्ट होती आणि इत...