पोस्ट्स

नाईक बुवा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक २४ : दमगढची रामकुटी

इमेज
आता फक्त थोडेसे अंतर चालल्यावर नर्मदा मातेचे उगमस्थान अर्थात अमरकंटक चे अद्भुत दर्शन होणार होते ! फेरी सेमल आणि दमगड गावे ओलांडून रामकुटी मध्ये जावे , तिथे सदाव्रत घेऊन पुढे मैयाच्या काठाकाठाचा मार्ग पकडत पुढे अमरकंटकला पोहोचावे असे नियोजन मनात सुरु होते .   दमगढ पूर्वीचे आरण्य  मार्गा तील खुणेच्या चिंध्या परंतु राम कुटी आश्रमामध्ये तेथील महंत श्रीराम महाराज आलेले आहेत असे कळाले आणि त्यांचे दर्शन अवश्य घ्यावे असे देखील गावातील लोकांनी सांगितले . त्यामुळे रामकुटीचा मार्ग पकडला .  मार्गदर्शक फलक मार्ग म्हणजे कच्ची पायवाटच होती आणि पावसामुळे तिचा पुरेपूर चिखलदरा झाला होता ! वाटेमध्ये बाबांना भेटायला आलेल्या शहरी भक्तांच्या चिखलात रुतलेल्या एकेक गाड्या दिसू लागल्या ! जिथे गाडी रुतेल तिथेच ती सोडून चालत जाण्याशिवाय भक्तांकडे दुसरा पर्याय नव्हता ! आधी अल्टो मारुती अशा छोट्या गाड्या चिखलात फसल्या होत्या . पुढे इंडिका , वगैरे गाड्या रुतल्या होत्या . सर्वात शेवटी इनोवा , एण्डेवर अशा मोठ्या ताकदवान गाड्या चिखलात परिपूर्ण रुतल्या होत्या ! नि