पोस्ट्स

उत्तर तट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक १२८ : कडीपानी ची कडी परीक्षा व जलमग्न कलहंसेश्वर अर्थात हाफेश्वर

इमेज
वाजेपूरची बावडी सोडली आणि पुढे तलाव लिंबडी रायसिंगपुरा बुंजर चिखली अशी गावे पार करत कडीपानी या ठिकाणी आलो . हे सर्व आदिवासी क्षेत्र आहे . डोंगराळ प्रदेश ,कठीण माणसं ! मध्ये रायसिंगपुरा या गावामध्ये एक मूर्तिकार भेटला . त्याचे नाव होते नागिनभाई कोदरभाई सिलावट . याने मला चहा पिण्यासाठी घरी बोलावले . चक्क मराठी भाषेमध्ये बोलत होता ! नंतर कळाले की याच्या सौभाग्यवती नंदुरबार जिल्ह्यातल्या असल्यामुळे याला मराठी येत होते . मूर्ती बनवण्यासाठी हा महाराष्ट्र मध्ये फिरलेला होता . तसा हा पूर्वीचा महाराष्ट्राचाच भाग ! नवीन राज्य रचनेमुळे मध्य प्रदेश आणि गुजरातला मिळालेला . पूर्वी गुजरातचा विस्तार मुंबईपर्यंत होता . आता सुद्धा कानबेडा या गावातून मी एक गंमत पाहिली होती आणि तिची नोंद डायरीमध्ये केलेली आहे ! या गावावरून दर पाच मिनिटाला एक विमान उडत होते . साधारण उडाण्याची दिशा पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की हा बहुतेक मुंबई ते कर्णावती (अहमदाबाद ) हवाई मार्ग आहे . अशा अनेक गमतीशीर गोष्टी परिक्रमेमध्ये दिसायच्या . लिहून ठेवल्या तेवढ्या लक्षात राहतात . बाकीच्या हळूहळू विस्मरणात जातात . रायसिंग पुरा गावाम